सूक्ष्म सिंचन संच न बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मेनंतर वगळणार
सूक्ष्म सिंचन संच न बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मेनंतर वगळणार 
मुख्य बातम्या

सूक्ष्म सिंचन संच न बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मेनंतर वगळणार

टीम अॅग्रोवन

ऑनलाइन अर्जाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत ठिबक संच न बसविल्यास यादीतून त्यांचे नाव वगळले जाणार आहे. ऑनलाइन अर्जाची मुदतदेखील १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधीचा तुटवडा नसल्याने ऑनलाइन अर्जाचा कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. "ठिबकसाठी चालू वर्षात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना सरसकट ४५ टक्के अनुदान मिळणार आहे. मूळ योजनेनुसार अर्जाची मुदत नोव्हेंबरमध्येच समाप्त झाली होती. मात्र, आता १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  राज्याचे कृषी उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांना पाठविलेल्या पत्रानुसार पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील पाच महिन्यांच्या आत ठिबक संच बसविणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे." ई-ठिबक प्रणालीवर २०१७-१८ मधील ऑनलाइन कामकाजाकरिता अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असली तरी १५ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांना कृषी अधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंतच पूर्वसंमती द्यावी. त्यानंतरची शेतकऱ्यांची यादी २०१८-१९ मधील कामकाजात टाकली जाणार आहे. मात्र, या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत संच घ्यावे लागतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. "कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत ठिबक संचाची उभारणी न केल्यास अशा शेतकऱ्यांची नावे २०१८-१९ मधील कामकाजातून वगळली जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी संचाची कामे नियोजनानुसार वेळेत करणे क्रमप्राप्त आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT