शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रशिक्षण आवश्‍यक : डॉ. दत्तात्रय वने 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रशिक्षण आवश्‍यक : डॉ. दत्तात्रय वने

टीम अॅग्रोवन

नगर  ः ‘‘पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. शेतीला पाण्याबाबत काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. त्यासाठी सध्या सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना काटेकोर सूक्ष्मसिंचन, तर भुईदंडाने पाणी देणाऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे दोन गट करा,’’ असे मत कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने यांनी व्यक्त केले.   राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘काटेकोर पाणी व्यवस्थापन, दृष्टिकोन व संधी’ या विषयावर एकदिवसीय सल्लागार कार्यशाळा झाली. त्यात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक बँक अर्थसाह्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषिविज्ञान व तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. ‘पोकरा’चे प्रमुख कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, कृषी उद्योजकतज्ज्ञ रफीक्षमक नाईकवाडी, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. खोडके, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. वडतकर, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. ए. ए. अत्रे, प्रकल्प सहसमन्वयक एम. जी. शिंदे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एच. डब्ल्यू. आवरी आदी उपस्थित होते.  कार्यशाळेत काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, अवलंबन करीत असलेल्या काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी रणनीती आखून पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा आणणे, लायसिमीटर तंत्रज्ञानाद्वारे विविध पिकांचे पीक गुणांक तयार करणे, त्यांद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन करणे, याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन संशोधन प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध तंत्रज्ञानांची माहिती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जाणून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT