tower
tower  
मुख्य बातम्या

टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडा

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा सोशल मीडियावरील जाहिरातींद्वारे भुलवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडविले जात असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींतून समोर आले आहे. कमी जागेत दर महिन्याला अधिक उत्पन्न मिळेल, या आशेने अनेक शेतकरी फसविले जात असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  सध्या सोशल मीडियावरूनही त्यांची फसवणूक होत आहे. तुमच्या शेतात मोबाईल टॉवर बसवा आणि लाखो रुपये कमवा, अशा जाहिराती सोशल मीडियावर केल्या जात आहेत. कमी जागेत दर महिन्याला उत्पन्न सुरू होईल या भाबड्या आशेवर शेतकरीही त्याला फसत आहेत. संबंधित जाहिरातीत मोबाईल नंबर असतो. त्या मोबाईलला शेतकरी फोन करतात. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या जमिनीचा सात-बारा, खाते उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड मागवून घेतात. त्यानंतर त्यांना कागदपत्रे योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशनसाठी ३० किंवा ६० हजार रुपये त्यांच्या खात्यावर भरा असे सांगतात. शेतकऱ्यांनी ते पैसे भरल्यावर त्यांना ३० ते ६० लाख रुपये तुमच्या खात्यावर भरतो, बॅंक खात्याचे डिटेल्स पाठवा असे सांगतात. ते पाठवल्यावर त्या पैशांची जीएसटी भरावी लागणार आहे, त्यासाठी ५० ते ८० हजार रुपये भरा, असे सांगतात. ते भरल्यावर टॉवरचे साहित्य ट्रकामध्ये भरले आहे, ट्रकाला टोल व अन्य कामांसाठी आणखी १० ते २० हजार भरा, असे सांगतात. ते भरल्यावर साहित्य भरल्याचा ट्रक चार ते पाच दिवस पोचला नाही म्हटल्यावर ते संबंधिताला फोन करतात. त्या वेळी संबंधिताचा फोन बंद लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आपली फसवणूक झाल्याचे समजते. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांना टॉवर देतो असे सांगून गंडवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  मी फसलो, तुम्ही फसू नका मी जाहिरात बघून शेतात टॉवर बसवण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकाला फोन केला. त्यांनी कागदपत्रे मागितली. ती दिल्यावर त्यांनी ३० हजार रुपये रजिस्ट्रेशनसाठी मागितले. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांत खात्यावर ९० लाख भरतो, त्याच्या जीएसटीसाठी ६० हजार भरा असे सांगितले. ते भरल्यावर दोन दिवसांत साहित्य येईल, ट्रकचे भाडे आणि टोलसाठी १० हजार भरा, असे सांगितले. असे करत मला दोन लाखाला फसवले आहे. अन्य शेतकऱ्यांनी असे फसू नये, असे एका शेतकऱ्याने सांगितले. प्रतिक्रिया कोणत्याही टॉवर कंपन्या सोशल मीडियावर जाहिराती करून टॉवर उभे करत नाहीत. त्यासाठी अगोदर ते सर्व्हे करतात. त्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी थेट शेतकऱ्यांकडे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जाहिरातींना फसून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये.  - धीरज पाटील, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT