तुरीच्या ऑनलाइन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
तुरीच्या ऑनलाइन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ 
मुख्य बातम्या

तुरीच्या ऑनलाइन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन

नगर ः हमी दराने तूर खरेदी करण्यासाठी शासन हमी केंद्रे सुरू करणार आहे. मात्र, अजूनही त्याच्या हालचाली नाहीत. सध्या फक्त ऑनलाइन नोंदणी करून घेतली जात आहे. गेल्यावर्षी तूर विक्रीसाठी कित्येक दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. यंदा मात्र चक्क नोंदणीकडेच पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये अवघ्या २३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बाजारातही हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची विक्री होत आहे. 

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी (हमीदर) यासाठी शासन प्रयत्न करते. गेल्या काही वर्षांपासून हमी दराने मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर आदी शेतमालाच्या खरेदीसाठी जिल्हा मार्केटींग फेडरेशनमार्फत हमी केंद्रे सुरू करुन खरेदी केली जाते. गेल्या वर्षांपासून शेतमाल विक्री करण्यासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना संदेश देऊन शेतमाला विक्रीला आणण्याचे अवाहन केले जाते. पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे यंत्रणा सांगत आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हमी केंद्राकडे सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

मूग, उडीद, सोयाबीनच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करायला प्रतिसाद मिळत नसल्याने चार वेळा मुदतवाढ करावी लागली. तरीही शेतकरी इकडे फारसे फिरकले नाहीत. तिच गत आता तुरीबाबत होत आहे. मुळात तुरीची खरेदी केंद्रे नेमके कधी सुरू होणार, याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे फारशी माहिती नाही. 

सध्या फक्त ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे अावाहन केले जात आहे. ऑनलाइन नोंदणीला सुरवात होऊन बारा दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही नोंदणीला प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यामध्ये साधारण नऊ ते दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्याची गरज असल्याचे मत मार्केटींग फेडरेशनने व्यक्त केली होती. प्रत्यक्षात आत्तापर्यंत चार केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. त्यात नगर व राहुरी केंद्रावर प्रत्येकी १ शेतकऱ्याने नोंदणी केली आहे. श्रीगोंद्याला ८ तर शेवगावला २२९ शेतकऱ्याने हमी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

पाच हजारांच्या आतच दर तुरीची ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमी दराने तूर खरेदी करण्यासाठी शासन हमी केंद्रे सुरू करणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली जात असून त्याला प्रतिसाद नाही. मात्र, बाजारातही तुरीची हमी दरापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जात आहे. सध्या बाजारात तुरीला पाच हजारांच्या आतच दर आहे. असे असताना हमी केंद्रावर तूर विक्री करण्यास शेतकरी का धजावत नाहीत, असा प्रश्‍न प्रशासनालाही पडला आहे. खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी बाजार समित्याकडे सर्व यंत्रणा असताना मार्केटींग फेडरेशनने मात्र बाजार समित्यांना खरेदी केंद्रे सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT