banana export 
मुख्य बातम्या

संकटातही कंदरच्या शेतकऱ्यांकडून आखातात ६० टन केळी निर्यात !

सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतीशील केळी उत्पादक व निर्यातदार प्रवीण डोके यांनी कोरोना विषाणूच्या संकटातही आखातात ६० टन केळीची यशस्वी निर्यात केली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणेः सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतीशील केळी उत्पादक व निर्यातदार प्रवीण डोके यांनी कोरोना विषाणूच्या संकटातही आखातात ६० टन केळीची यशस्वी निर्यात केली आहे. शनिवारी (ता. २८) कंदरहून तीन कंटेनर्स् इराणला रवाना झाले आहेत. यात डोके यांच्यासह १० शेतकऱ्यांच्या मालाचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रवीण डोके यांनी ‘सन स्टार एवन’ नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. कंपनीचे सुमारे ६० सभासद आहेत. डोके यांनी २००७ मध्ये केडी फ्रूटस नावाने निर्यातविषयक कंपनीही स्थापन केली आहे. 

डोके यांची एकूण संयुक्त कुटूंबाची ३५ एकर शेती आहे. त्यात सुमारे २० ते २५ एकर केळीचे पीक असते. त्यांच्याकडे १०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज व पॅकहाऊस यांचीही व्यवस्था आहे. दरवर्षी स्वतःच्या कंपनीतर्फे डोके सुमारे १०० ते १५० कंटेनर्स केळीची निर्यात करतात. अन्य निर्यातदार कंपन्यांसाठी देखील प्रक्रिया सुविधा देतात. 

श्री. डोके म्हणाले, की कंदर व परिसरातील भागात केळीचे क्षेत्र अंदाजे सहा हजार हेक्टरपर्यंत आहे. वर्षाला सुमारे साडेचार लाख टनांपर्यंत केळी उत्पादन होते. आमच्या भागातील केळीची सर्वत्र ओळख तयार झाली आहे. कोरोना संकटामुळे केळी उत्पादक प्रचंड संकटात सापडले आहेत. दर किलोला ४ ते ५ रूपयांपर्यंत घसरले आहेत. ग्राहक बाजारपेठेत मात्र हे दर कमी नसून ते चढेच आहेत. 

आखाती देशांत निर्यातीचे प्रयत्न   ‘‘कोरोना संकटाच्या काळात केळीला किलोला किमान ७ ते ८ रूपये दर मिळावा या हेतूने आम्ही आखाती देशांमध्ये सागरी मार्गाने निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू केले. केडी फ्रूटस कंपनीच्या वतीने शनिवारी (ता. २८) तीन कंटेनर्समधून ६० टन केळी कंदरहून इराणला रवाना केली. यात सुमारे १० शेतकऱ्यांच्या मालाचा समावेश आहे. कोरोना संकटामुळे निर्यात साखळी, वाहतूक, मजूर, सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे अशा समस्यांचा समना करावा लागत आहे. या सर्व समस्यांमधून यशस्वी निर्यात केल्याचे समाधान आहे. पुढील तीन दिवसांत अजून दोन ते तीन कंटेनर किंवा आठवड्याला दहापर्यंत कंटेनर्स आखाती देशांमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आहे,’’ असे श्री. डोके यांनी सांगितले.  

निर्यात वाढविण्याचे प्रयत्न श्री. डोके म्हणाले, कि रमजानचा सण पुढील महिन्यावर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने आखाती देशांत केळीला मागणी वाढली आहे. मात्र कोरोना संकटामुळे मागणीएवढा पुरवठा होणे सगळीकडूनच अशक्य झाले आहे. ओमान, सौदी अरेबिया, दुबई किंवा एकूणच अरही देशांत केळी पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सागरी मार्गाने निर्यात करण्यासाठी प्रति कंटेनर पूर्वी असलेले फ्रेट शुल्क १३०० डॉलरवरून १७०० डॉलरवर पोचले आहे. मात्र केळीला मागणी चांगली आहे व दरही टिकून आहेत.   

शेतकऱ्यांना खुपच कमी दर सध्या बाजारात केळी डझनाला ६० रूपयाने ग्राहकांना विक्री केली जात आहे. व्यापारी किंवा मध्यस्थ मात्र केवळ तीन ते चार रूपये एवढ्या मातीमोल दराने आमच्याकडून केळी खरेदी करीत आहे. वर्षभर मोठे कष्ट करून दर्जेदार केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र कोणीही वाली उरलेला नाही. त्याच्या हाती मोठे आर्थिक नुकसानच पडणार आहे. 

निर्यातीसाठी शासनाने द्याव्यात सुविधा  ‘‘पडलेल्या दराच्या या काळात निर्यात हा एक चांगला पर्याय आहे. निर्यातीसाठी लागणारे बॉक्स, बॅग्ज व अन्य साहित्य अत्यावश्यक सेवेत आणून सरकारने ते पुरेसे व योग्य वेळेत उपलब्ध केले तरच निर्यात सुकर होईल. सद्यस्थितीत आमच्याकडे बॉक्सचा साठा असल्याने निर्यातीत अडचण आली नाही. मात्र भविष्यात हे संकट उभे राहणार आहे,’’ असे डोके यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT