Farmers groups, come together by companies: Dr. Dhawan
Farmers groups, come together by companies: Dr. Dhawan 
मुख्य बातम्या

शेतकरी गट, कंपन्यांद्वारे एकत्र या : डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

हिंगोली : ‘‘शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगास चालना देणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठातर्फे बांधावर आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोचवले जात आहे. शेतमालाची विपणन साखळी बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

चिखली आणि पांगरा सती (ता.वसमत) येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात डॉ. ढवण बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पि. आर. देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे, तालुका कृषी अधिकारी जी. बी. कल्याणपाड, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक मुळजकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस. घुगे, कृषी सहाय्यक खंदारे, पि. के. माने, श्रीनिवास शिंदे, कृषी अधिकारी दहिवडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

चिखली येथील शेतकरी चंद्रकांत जेठुरे यांच्या शेतावर घन पद्धतीने लागवड केलेल्या पेरू बागेची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, विपणन, प्रक्रिया यांच्या बद्दल माहिती दिली. डॉ. ढवण यांनी प्रल्हादराव काळे यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पेरणी केली.

वसमत-पूर्णा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. अंतर्गत पांगरा सती येथील शेतकरी संजय लोंढे यांच्या शेतावर दोन किलोमीटर अंतर पायी चालत जात करवंद, सीताफळ, पेरु या पिकांची पाहणी केली.  कृषी विद्यापीठातर्फे प्रशिक्षणे, प्रक्रिया याबाबत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक बालाजीराव यशवंते, गंगाधर साखरे, संजय शिंदे, लक्ष्मीकांत खोले, बळीराम काकडे, ज्ञानदेव गुट्टे, हरी बुचाले, अविनाश शिंदे, मारोती शिंदे,अनिल कदम उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT