औरंगाबाद : उत्पादन चांगलं होईल, मालाचा दर्जा चांगला राहील, दरही चांगले मिळतील, ही मोसंबी उत्पादकांची आशा सातत्याने होणारी फळगळ धुळीस मिळवीत असल्याचे चित्र मराठवाड्यात पाहावयास मिळत आहे. याशिवाय सद्यःस्थितीत मोसंबी बागांमध्ये पाने खाणाऱ्या अळीचे झालेले आक्रमण उत्पादकांची चिंता वाढवीत आहे. अर्थकारण बिघडविणाऱ्या या फळगळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संशोधनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी पुढे येत आहे.
मराठवाड्यातील मोसंबीचे क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील शेतकरी फळपिकांमध्ये मोसंबीला प्राधान्य देत आहेत. सातत्याने होणाऱ्या फळगळीचा मुद्दा पुन्हा एकदा होत असलेल्या फळगळीने ऐरणीवर आला आहे. आता सुरू असलेल्या आंबिया बहरात ७० ते ८० टक्के शेतकरी फळगळीवर उपाय योजत असताना त्यामध्ये त्यांना यश मिळत नसल्याचे सांगतात. सरासरी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत फळगळ होत असून काही बागांमध्ये ही फळगळ ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अनेक मोसंबी उत्पादक होत असलेली फळगळ पाहून दर मिळण्याची वाट न पाहता मिळणाऱ्या भावात मोसंबी बागा देऊन मोकळे होत आहेत. त्याचा थेट परिणाम त्यांना मिळणाऱ्या दरावर, परिणामी त्यांच्या एकूणच अर्थकारणावर होताना दिसतो आहे. हंगाम सुरू झाला त्या वेळी २५ ते ३० हजार रुपये प्रति टनापर्यंत असलेले मोसंबीचे दर अलीकडच्या काही दिवसांत १२ ते २० हजार रुपये प्रतिटनावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे विद्यापीठस्तरावरून मोसंबीच्या फळगळीसाठी शेतकऱ्यांना ठोस मार्गदर्शन करण्याची व शेतकऱ्यांनीही ते अंगीकारण्याची मागणी पुढे येत आहे. प्रतिक्रिया मोसंबीचे क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. एकाच बहराचे व्यवस्थापन, संजीवकाची फवारणी, पाण्याचा निचरा करणे, जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी उभी आडवी पाळी मारणे, बुरशीनाशकाची आळवणी आदी उपायातून मोसंबीमधील फळगळीवर नियंत्रण मिळविता येईल. - डॉ. संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर जि. जालना
फळगळीचा मुद्दा बहरागणिक कायम ऐरणीवर असतो. सुचविलेले उपाय योजल्यानंतरही फळगळ थांबत नाही. तज्ज्ञांनी मोसंबी उत्पादकांना सातत्याने भेडसावत असलेल्या प्रश्नांवर परिणामकारक उपाय सुचविण्याची व शेतकऱ्यांमध्ये त्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. - डॉ. राजेंद्र चोरमले, मोसंबी उत्पादक, घुंगर्डे हदगाव, जि. जालना
मोजके शेतकरी वगळता ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांच्या बागेत मोठ्या प्रमाणात फळगळ होते आहे. काही बागांत हे प्रमाण २५ ते ३० टक्के, तर काही बागांत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. - इंद्रजित उढाण, मोसंबी उत्पादक, तीर्थपुरी, जि. जालना
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात खत, औषध, तण व्यवस्थापन केले. परंतु अलीकडच्या दोन तीन दिवसांपासून फळगळ होते आहे. १० ते १५ टक्के फळगळ आहे. इतर शेतकऱ्यांच्या बागेत २० ते २५ टक्के फळगळ होते आहे. यावर संशोधन होऊन कायमस्वरूपी उपाय सुचविला जावा. - प्रल्हाद गलधर, रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद तज्ज्ञांच्या मते फळगळीची कारणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.