वणी तालुक्यात शेतकऱ्यांचे उपोषण
वणी तालुक्यात शेतकऱ्यांचे उपोषण 
मुख्य बातम्या

दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषण

Vinod Ingole

वणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वणी तालुक्‍यात एकाचवेळी दहा गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. घटस्थापनेपासून (गुरुवारी, ता. २१) या उपोषणाला सुरवात झाली. लढा शेतकऱ्यांच्या हक्‍काचा या संघटनेचे रुद्रा कुचनकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.

वणी तालुक्‍यातील सोनापूर, सोमनाळा, नांदेपेरा, नायगाव खुर्द, भालर,शिरपूर, नवेगाव, खोदला, बोरगाव, गोपालपूर या दहा गावांतील शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत.

वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण शासनाने करावे किंवा ग्रामपंचायतीला दोन बंदुका देऊन वन्यप्राण्यांना ठार मारण्याची परवानगी मिळावी, बिनशर्त सरसकट कर्जमुक्‍ती करावी, भारनियमन बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, जाहिरनाम्यातील शेतकरी हिताच्या मुद्द्यांची पूर्तता करावी या मागण्यांसाठी शेतकरी उपोषण करीत आहेत.

दरम्यान, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सोमनाळा येथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करीत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु शेतकऱ्यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत ठोस पावले उचलेपर्यंत हे उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारी (ता. २२) देखील उपोषण सुरू होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT