केळी
केळी  
मुख्य बातम्या

वणवण करूनही फळपीक विमा योजनेपासून वंचितच

टीम अॅग्रोवन

जळगाव ः आपल्या केळी पिकाला विमा संरक्षण मिळावे, यासाठी बिगरकर्जदार असलेले दोन शेतकरी मागील १० दिवस वणवण फिरले. आपले सरकार केंद्र, बॅंक, अशा चकरा त्यांनी मारल्या...विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर अनेक वेळा फोन केले...पण तेथे फोन स्वीकारला जात नव्हता...शेवटी योजनेत सहभागाची ३१ ऑक्‍टोबर ही मुदत संपली...अशा सगळ्या सावळ्या गोंधळात त्यांचे विमा योजनेचे अर्जच भरले गेले नाहीत. या शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव ‘ॲग्रोवन’ला सांगत असताना फळपीक विमा योजना फसवी असल्याचा आरोपही केला. वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील धर्मराज पुंडलिक पाटील यांना आपल्या सहा हेक्‍टर केळीसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून विमा संरक्षण घ्यायचे होते. ते बिगरकर्जदार प्रकारात असून, त्यासाठी त्यांनी आपल्या गावानजीकच्या होळनांथे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील स्टेट बॅंकेत संपर्क साधला; पण या बॅंकेने आपल्याकडे बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करण्यासंबंधी शासनाचे परिपत्रक नसल्याचे सांगितले. नंतर पाटील हे चोपडा शहरात आपले सरकार केंद्रात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी गेले. तीन केंद्रांत त्यांना नकारघंटा ऐकायला मिळाली. पोर्टलच सुरू होत नसल्याचे त्यांना सांगितले गेले.  किनोद (ता. जळगाव) येथील सतीश सीताराम पाटील हेदेखील बिगरकर्जदार शेतकरी असून, त्यांना चार हेक्‍टर केळीसाठी विमा संरक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी आपल्या गावानजीकच्या भोकर (जि. जळगाव) येथील स्टेट बॅंकेत संपर्क साधला; पण बॅंकेने अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला. मग पाटील हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जळगाव शहरात आपले सरकार केंद्रात पोचले. जळगाव शहरातील पाचही आपले सरकार केंद्रांत त्यांना हे अर्ज भरता येत नाहीत, पोर्टलच सुरू होत नाही, असे सांगण्यात आले.

टोल फ्री क्रमांकावर प्रतिसाद मिळेना आपली अडचण विमा योजनेसंबंधी नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्को कंपनीला सांगण्यासाठी सतीश पाटील व धर्मराज पाटील या दोघांनी कंपनीने जारी केलेल्या ०२२६६३८३६९९ आणि ०२२६६३८३६९० या टोल फ्री क्रमांकांवर १०० वेळेस फोन केले; पण तेथे प्रतिसादच मिळाला नाही. शेवटी हतबल झालेले हे दोन्ही शेतकरी फळपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. विमा हप्ता भरण्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर होती. आता योजनेत सहभागी होण्यासंबंधी कुठलीही शक्‍यता नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT