Farmers' agitation tomorrow to buy whole cotton
Farmers' agitation tomorrow to buy whole cotton 
मुख्य बातम्या

सरसकट कापूस खरेदीसाठी उद्या शेतकऱ्यांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन

अकोला ः सध्या राज्यात केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या उर्वरित कापसाचे करायचे काय, असा प्रश्‍न तयार झाला आहे. एफएक्यू वगळता इतर दर्जाच्या कापसाचे प्रमाण हे अधिक असल्याने मोठा पेच असून शासनाने सरसकट खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. या बाबत शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. ३०) लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना अलर्ट करण्यासाठी फोन करण्याचे, एसएमएस पाठविण्याचे आंदोलन पुकारले आहे. 

शेतकऱ्यांकडे असलेला नॉन एफएक्यू कापूस सीसीआय तसेच पणन महासंघाने खरेदी करावा, अशी मागणी अनेकांनी करूनही अद्याप शासनाकडून कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर न उतरता आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे आंदोलन गुरुवारी दिवसभर केले जाईल. यात प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केलेले आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने कापूस खरेदी बंद पडली होती. 

आता कापूस खरेदी सुरू झाली तरी केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस घेतला जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडील केवळ २० ते ३० टक्केच कापूस पात्र ठरत आहे. व्यापारीसुद्धा कापूस घ्यायला तयार नाहीत. यंदा अतिवृष्टी, पावसाच्या तडाख्यात कापसाचे मोठे नुकसान झाल्याने दर्जा घसरलेला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी इतर कापसाचे काय करायचे, असा प्रश्‍न पडलेला आहे.

असे करणार आंदोलन  गुरुवारी आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यांवर न उतरता प्रत्येकाने स्वतःच्या घरीच थांबून त्यांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना दिवसभर फोन करून, एसएमएस पाठवून शेतकऱ्यांचा नॉन एफएक्यू कापूस खरेदी करण्याची मागणी करायची आहे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य अध्यक्ष सतीश दाणी, सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT