शेतकऱ्यांनी मार्केटिंग कौशल्य आत्मसात करावे  : डॉ. कडू
शेतकऱ्यांनी मार्केटिंग कौशल्य आत्मसात करावे : डॉ. कडू 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी मार्केटिंग कौशल्य आत्मसात करावे : डॉ. कडू

टीम अॅग्रोवन

नागपूर : उत्पादकता वाढीचा टप्पा गाठल्यानंतर शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी  आयात-निर्यात धोरणांचा अभ्यास करण्यासोबतच निर्यातदार म्हणून पुढे यावे, असे प्रतिपादन रामेती संचालक डॉ. अर्चना कडू यांनी केले.

रामेतीतर्फे संत्रा आणि भाजीपाला निर्यातीला चालना मिळण्याच्या उद्देशाने एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवारी (ता. २२) करण्यात आले. निर्यात पणन तज्ज्ञ मिलिंद हांडे, सहायक संचालक मिलिंद मुऱ्हेकर, पल्लवी तलमले, अनुरूपा शास्त्री, निर्यातदार प्रफुल्ल बांडाबुचे उपस्थित होते.

डॉ. कडू म्हणाल्या, ‘‘रामेतीतर्फे कृषी सहायक आणि पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षणाची सोय केली जाते. निर्यातीला चालना मिळावी, यासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांची निर्यातीविषयी पोषक मानसिकता आहे. संत्रा आणि भाजीपाला निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. त्यादृष्टीने हे प्रशिक्षण उपयोगी पडेल.''

गोविंद हांडे यांनी राज्यभरात निर्याती संदर्भाने उभ्या झालेल्या मॉडेलची मांडणी केली. बारामतीतील युवा शेतकऱ्याच्या वातानुकूलित आणि सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्राविषयीदेखील त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT