farmer dont get harvester for wheat mealting
farmer dont get harvester for wheat mealting 
मुख्य बातम्या

वाशीम : गहू काढणीसाठी शेतकऱ्यांना हार्वेस्टर मिळेना 

टीम अॅग्रोवन

रिसोड जि. वाशीम ः तालुक्यात यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र वाढविले होते. गव्हाचा विक्रमी पेरा झालेला आहे. मात्र, ऐन काढणीच्या हंगामात लहरी पावसाचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे हवामान बदल झाला असल्याने शेतकऱ्यांनी गहू मळणीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. 

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यातून हार्वेस्टर मशीन दाखल झाले आहेत. गहू कापणीसाठी मजुरांकडून मजुरीचे वाढीव दर मागितले जात आहेत. शिवाय दर देऊनही काम वेगाने होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टरद्वारे मळणी करण्यास प्राधान्य दिले आहे. एकाच वेळी गहू काढणीसाठी शेतकरी सरसावले असल्याने हार्वेस्टर चालकांकडे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. 

शेतकऱ्यांना गहू सोंगणी, मळणीसाठी मोठा खर्च येतो. परंतु हार्वेस्टरने मळणी केल्यास एकरी १७०० ते १८०० रुपयांत काम होते. कमी वेळेत हमखास पीक हातात पडते. त्याही कारणाने यंत्राला पसंती वाढली आहे.

गहू सोंगणीस एक मजूर दोनशे रुपये दररोज प्रमाणे सांगावा लागतो. यामुळे एकरी दोन हजार खर्च होतो. तसेच मळणीसाठी वेगळा खर्च येतो. त्यामुळे हार्वेस्टरने मळणी केल्याने १५०० रुपयांत व कमी वेळेत काम होते.  - नारायण चोपडे, शेतकरी, भर जहांगीर, जि. वाशीम 

हार्वेस्टरच्या साह्याने गहू काढण्यासाठी एकरी दीड हजारांचा खर्च लागतो. महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड झालेली आहे. सध्या एकाच वेळी पीक काढणीसाठी गर्दी होत आहे.  - धर्मासिंग, हार्वेस्टर मालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT