कीटकनाशक फवारणी प्रकरण
कीटकनाशक फवारणी प्रकरण 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार आरोग्य तपासणी

विजय गायकवाड

मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये यासाठी यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १८ ऑक्टोबरपासून करण्यात आले आहे. कृषी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यवतमाळ दुर्घटनेनंतर अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात हे विशेष अभियान राबविण्यात येईल. कीटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजुरांनी आरोग्य तपासणी संदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करून घ्यावी. सदर अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करून घेणाऱ्या शेतमजुराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याच वेळी कृषी विभागामार्फत कीटकनाशकांच्या फवारणी वेळी वापरावयाच्या सुरक्षितता किटचे मोफत वाटप करण्यात येईल. प्रमाणपत्र पाहून काम द्यावे पुढील फवारणीसाठी शेतमजुरांना काम देताना त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षितता किट असल्याची खात्री शेतकरी बांधवांनी करावी त्यानंतर त्यांना फवारणीचे काम द्यावे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. कीटकनाशक फवारणीचे काम करणाऱ्या शेतमजुरांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT