digital farming
digital farming  
मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांनो, डिजिटल शेतीसाठी सज्ज व्हा: तज्ज्ञ

टीम अॅग्रोवन

पुणे : विद्यार्थ्यांनो, आता पारंपरिक चौकटीतून बाहेर पडा आणि डिजिटल शेतीसाठी सज्ज व्हा, अशी वैज्ञानिक हाक आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी दिली. या वेळी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून भारतीय विद्यार्थी या आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याची चुणूकदेखील दाखवून दिली.  ड्रोन्सचा शेतीतील वापर, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषियंत्रे व मशिन लर्निंग अशा विविध विषयांवर पुणे कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व विद्यार्थी शुक्रवारी (ता.१०) अभ्यासपूर्ण संवाद झाला. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत राहुरी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन (सीएसएडब्ल्यूएम) प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या पुणे कृषी महाविद्यालयातील उपकेंद्राकडून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ होते.  शास्त्रज्ञ डॉ. मंजुळकुमार हजारिका (बॅंकॉक), डॉ. डेव्हिड ब्राऊन (अमेरिका), डॉ. सिंधुजा शंकरन (अमेरिका), डॉ. लव्ह खोत (अमेरिका), डॉ. गणेश बोरा (अमेरिका), डॉ. शिवा बालसुंदरम् (मलेशिया), डॉ. एस. रावण (मलेशिया) तसेच शास्त्रज्ञ डॉ. सुनील गोरंटीवार, प्राचार्य सुनील मासाळकर, डॉ. जयश्री पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल शेतीचे धडे दिले.   डॉ. हजारिका म्हणाल्या की, “ड्रोन्सचा शेतीमधील वापर हा वाढत जाईल. गुगल अर्थ इंजिनचा वापर शेतीसाठी करता येईल. गुगलच्या माहितीचा वापर करून शेतीमधील डॉक्युमेंटशन व माहितीचे पृथ्थकरण करता येते.” यावेळी डॉ. ब्राऊन यांनी “शेतीमध्ये दैनंदिन निर्णय घेताना स्थानिक हवामान अंदाज महत्त्वाचा ठरतो, असे सांगितले. “हवामान अंदाजासाठी ‘आर पायथॉन’ व ‘एसक्युएल’ अशी डेटा सायन्स टूल्स् उपलब्ध आहेत. माहितीची ही नवी तंत्रे वापरून माहिती विश्लेषकांना कृषी क्षेत्रात चांगले बदल घडविता येतील,” असेही ते म्हणाले.  डॉ. सिंधुजा शंकरन (अमेरिका) म्हणाल्या की, “कृषी वनस्पतीशास्त्रात फिनोमिक्स व जिनोमिक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लनिंगमधून या दोन्ही संकल्पनांचा वापर पीक सुधारणांसाठी करणे शक्य झाले आहे. फिनोमिक्स्मध्ये बाह्य नजरेला गुणवैशिष्ट्ये समजतात तर जिनोमिक्समधून जैव तंत्रज्ञानाच्या अंगाने रचना कळतात. मशिन लर्निंगचा एक भाग इमेज प्रोसेसिंगचादेखील आहे. त्यातून आपल्याला सुपरवाईज लर्लिंग व अनसुपरवाईज लर्निंग विकसित करता येतील.”  डॉ. खोत यांनी काटेकोर शेती तंत्रज्ञान व डिजिटल शेतीवर माहिती दिली. “काटेकोर शेती करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीक ताण व्यवस्थापनाचा अभ्यास करावा लागेल. या अभ्यासासाठी आधुनिक ऑप्टिकल सेन्सरचा वापर अत्यावश्यक ठरणार आहे. जमिनीच्या पातळीलगत फिरणाऱ्या ड्रोन्सपासून ते अंतराळातील उपग्रहांचा वापरदेखील यात करणे शक्य आहे,” असे ते म्हणाले.  डॉ. बोरा यांनीही काटेकोर शेतीत बीग डाटा मोलाचा ठरणार असल्याचे स्पष्ट केले. “डाटा ट्रान्स्फर, बीग डाटा, मशिन लनिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे समतोल क्षमतेने वापर झाल्यास शेतीमधील कोणत्याही पिकाचे जास्त लाभ मिळू शकतील,” असे त्यांनी सांगितले.  असे असतील भविष्यातील शेतीचे सहा प्रकार  डॉ. बालसुंदरम् यांनी भविष्यातील शेतीचे विविध प्रकार विषद केली. पारंपरिक शेतीऐवजी भविष्यात हरित शेती (ग्रीन ॲग्रिकल्चर), शहरी (अर्बन) शेती, काटेकोर (काटेकोर) शेती, डिजिटल शेती, चाणाक्ष (स्मार्ट) शेती, हवामान अद्ययावत (क्लायमॅट अपडेटेड) शेतीचा विकास होत राहील, असे संकेत त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT