Experiment with group farming through factories 
मुख्य बातम्या

सामूहिक गट शेतीचा प्रयोग कारखान्यामार्फत राबवा

मजुरांची कमतरता आणि नियोजनबद्ध ऊस शेती करण्यासाठी यापुढे सामूहिक गट शेतीचा प्रयोग कारखान्यामार्फत राबविण्याची गरज असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी. एच. पवार यांनी व्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

शिराळा, जि. सांगली ः वारणा काठावरील ऊसपिकावर बुरशीजन्य तांबडे, नारंगी, पिवळे, तपकिरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्यांना शक्‍य आहे अशांनी उसाची पिवळी पडलेली पाने काढून जमिनीत गाडावी. त्याच बरोबर मजुरांची कमतरता आणि नियोजनबद्ध ऊस शेती करण्यासाठी यापुढे सामूहिक गट शेतीचा प्रयोग कारखान्यामार्फत राबविण्याची गरज असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी. एच. पवार यांनी व्यक्त केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) आणि चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत ऑनलाइन वेबीनार झाला. वारणा काठावरच्या चार तालुक्‍यांतील शंभरावर शेतकऱ्यांनी भाग घेतला. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी. एच. पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वरिष्ठ शास्त्रज्ञ पवार म्हणाले की, रुंद सरी, मोकळी हवा, खते, पाणी, बियाणे आणि बीजप्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ऊस लागणीपासून ऊस तुटेपर्यंत बारा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, मुख्य शेती अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांच्यासह वारणा काठावरील शंभरावर शेतकरी सहभागी झाले. बुरशीजन्य किडीने हजारो एकर ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस यामुळे जमिनीत साचून राहिलेले पाणी, खेळत्या हवेची कमतरता व कमी सूर्यप्रकाश यामुळे या बुरशीचा जास्त प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेबिनार घेण्यात आला.

कार्यकारी संचालक राम पाटील यांनी अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक गट शेतीचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे सांगून, कारखान्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

कोरोना महामारी कालावधीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करता आले नाही. मात्र, आमदार मानसिंगराव नाईक यांचे मार्गदर्शन घेऊन सात आठवडे विविध विषयांवरचे वेबिनार आयोजित करून शेतकऱ्यांना ऊस शेतीतील नव तंत्रज्ञानाची माहिती देऊ शकलो. - व्ही. एम. चव्हाण, मुख्य शेती अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT