Expensive agricultural mechanization due to diesel price hike 
मुख्य बातम्या

भंडारा : डिझेल दरवाढीमुळे महागले शेती यांत्रिकीकरण 

ऐन हंगामातच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेल्या वाढीमुळे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून होणारी कामेही महागली आहेत. सध्या डिझेल दरवाढीचे कारण देत ट्रॅक्टरधारकांनी दरात दुपटीने वाढ केली आहे.

टीम अॅग्रोवन

भंडारा ः ऐन हंगामातच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेल्या वाढीमुळे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून होणारी कामेही महागली आहेत. सध्या खरिपातील धान रोवणीला वेग आला असून सर्वत्र ट्रॅक्टरने चिखलणीचे काम होत आहे. मात्र, डिझेल दरवाढीचे कारण देत ट्रॅक्टरधारकांनी दरात दुपटीने वाढ केली आहे. 

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात १६१४९४ हेक्टर सरासरी धान पिकाखालील क्षेत्र आहे. त्यापैकी २२ हजार ३७५ म्हणजे अवघ्या १४ टक्के क्षेत्रावरच रोवण्या होऊ शकल्या. पावसाअभावी रोवण्याचे रखडलेल्या कामांना आता गती आली. मात्र, चिखलणीच्या कामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांसमोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. 

पंधरवाड्यापूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असताना ट्रॅक्टर मालकांकडून चिखलणीसाठी प्रती एकर १२०० ते १५०० रुपये आकारले जात होते. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होताच या कामासाठी आता दुपटीने आकारणी केली जात आहे. प्रती एकर २८०० ते ३००० रुपये भाडे आकारले जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. डिझेलचे दर ७८ ते ८० रुपयांवर पोचले असून प्रती एकर चिखलणीसाठी सरासरी २७ ते ३० लिटर डिझेलची गरज राहते. त्यामुळे दरातील वाढ योग्य असल्याचा दावा ट्रॅक्टर मालकांकडून केला जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Soybean Sowing : मराठवाड्यात २२ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

SCROLL FOR NEXT