कृषिपंपांची वीज जोडणी तोडल्याने अांदोलनाची ठिणगी
कृषिपंपांची वीज जोडणी तोडल्याने अांदोलनाची ठिणगी 
मुख्य बातम्या

कृषिपंपांची वीज जोडणी तोडल्याने अांदोलनाची ठिणगी

टीम अॅग्रोवन

अकोला ः अाधीच पिकांच्या उत्पादकतेत अालेली घट, बाजारात शेतमालाला नसलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला अाहे.  त्यातच अाता वीज कंपनीने वसुलीसाठी कृषिपंपांची जोडणी तोडण्याची माेहीम सुरू केली अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल असून, ठिकठिकाणी वीज कार्यालयात अांदोलने वाढली अाहेत. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उग्र अांदोलने केली.    वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मालेगावमध्ये वीज अभियंत्याला मारहाण केल्याची घटना समोर अाली. शिरपूर येथे शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत धडक दिली. बुलडाण्यात स्वाभिमानीच्या नेत्यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या अांदोलन केले. या संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अांदोलन झाले.  ऐन रब्बी हंगामात महावितरणने विज बील भरल्याशिवाय शेतकऱ्यांचे कनेक्शन जोडून दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आणि अनेक गावांमधील वीज रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कडाळे यांना घेराव घातला. याचा धसका घेत महावितरणने तातडीने १५ गावांना वीज रोहित्र देण्याची कार्यवाही सुरू केली. सोयाबीनवर भीस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या हातावर सरकारने कवडीमोल भाव दिल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे खरिपाची कसर रब्बीमध्ये काढून दोन पैसे हातात पडावे म्हणून बळिराजाने रात्रंदिवस मेहनत करून गहू, हरभरा, भाजीपाल्याची पिके लावली; मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला होता. विज बील भरा तरच विद्युत कनेक्शन जोडले जाईल, अशी भूमिका महावितरणने घेतली.   दुसरीकडे अनेक गावांमधील वीज रोहित्र जळाल्यामुळे तेथील विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी श्री. तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज कंपनीचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता कडाळे यांना घेराव घातला. याची दखल घेत तातडीने बुलडाणा तालुक्यातील भादोला, वाडी, रायपुर, साखळी बुद्रुक आणि सव, तर चिखली तालुक्यातील कारखेड, गोदरी, सोमठाणा, मगरध्वज, खंडाळा, मिसाळवाडी, अंचरवाडी आणि केळवद अशा एकूण १५ गावांत रोहित्र बसविण्याचे काम महावितरण लगेच हाती घेतले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT