बागायतदारांसाठी हवामान केंद्र उभारण्यास प्रयत्नशील ः बाबर
बागायतदारांसाठी हवामान केंद्र उभारण्यास प्रयत्नशील ः बाबर 
मुख्य बातम्या

द्राक्ष बागायतदारांसाठी हवामान केंद्र उभारण्यास प्रयत्नशील ः बाबर

टीम अॅग्रोवन

सांगली  ः द्राक्ष बागायतदारांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून राज्याच्या अर्थकारणात परकीय चलन मिळवून दिले आहे. भविष्यात द्राक्ष साठवणुकीसाठी अत्याधुनिक वेअर हाउस उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. द्राक्ष बागायतदारांसाठी हवामान अंदाज वर्तवणारी केंद्र उभारण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन आमदार अनिल बाबर यांनी दिले.

विटा येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या विटा शाखेच्या इमारत उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी आमदार मोहनराव कदम, राज्य द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, रामराव पाटील, प्रताप साळुंखे, सभापती आनंदराव पाटील, उपसभापती राजेश कदम, जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख, चंद्रकांत लांडगे यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, की द्राक्ष बागायत संघाने केवळ औषध आणि खतांची विक्री न करता बागायतदारांना मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. यामुळेच या संघटनेशी शेतकऱ्यांची बांधिलकी अधिक आहे. अनेक तज्ज्ञ मार्गदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बाजारात आलेल्या नवीन औषधांचा अभ्यास करूरुन त्याचे फायदे-तोटे बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. भविष्यात शेती विभाग आणि बागायतदार संघ यांनी एकत्रीपणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

राज्य द्राक्ष संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे म्हणाले, की देशांतर्गत बाजारपेठेतही आपली द्राक्षे पोहोचली पाहिजे; अन्यथा बाहेरील द्राक्ष आपल्या  देशातील बाजारपेठेत येण्याची शक्‍यता आहे. विट्यात शाखा सुरू झाल्याने विट्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT