Efforts to increase the durability of hurdles 
मुख्य बातम्या

हुरड्याची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी गुजरात राज्यातील वाडीलाल इंडस्ट्रीजला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी हुरडा फ्रोझन करून त्याच आयुष्य वाढवण्याबाबत तसेच हुरडा विक्रीच्या कराराबाबत प्राथमिक चर्चा केली.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘आत्मा’च्या माध्यमातून हुरड्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी गुजरात राज्यातील वाडीलाल इंडस्ट्रीजला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी हुरडा फ्रोझन करून त्याच आयुष्य वाढवण्याबाबत तसेच हुरडा विक्रीच्या कराराबाबत प्राथमिक चर्चा केली. 

मोटे म्हणाले, की गुजरात राज्यात हुरडा हा भाजून विक्री केला जातो. औरंगाबादमध्ये तो कच्चा बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असल्याचा प्राथमिक फरक आहे. आपल्याकडील हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. प्रयत्नाला यश आले तर हुरड्याचा टिकवण कालावधी वाढविता येणे शक्य होईल. हुरडा हा दोन दिवसांत खराब होताना दिसतो. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढला, तर तो वर्षभर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आपण वाडीलाल इंडस्ट्री सोबत शेतकऱ्यांचा ॲग्रीगेटर मार्फत करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. वाडीलाल ग्रुप हा हुरडा किमान सहा महिने ते वर्षभर फ्रोझन करतो. परंतु त्यांना हुरडा भाजून द्यावा लागतो. ५० किलो हुरडा प्रायोगिक तत्त्वावर भाजून पाठविण्यात आला आहे. सृष्टी ॲग्रो टुरिझमच्या प्रतिभा सानप यांनी ॲग्रिगेटर म्हणून हुरडा भाजून सप्लाय करण्याची तयारी दाखवली आहे. वाडीलालचे अधिकारी लवकरच भेट देणार आहेत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा डॉ. तुकाराम मोटे, प्रकल्प उपसंचालक अनिल साळुंखे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयत्न सुरू आहेत. मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, कृषी सहायक गणेश यादव, आत्माचे चंद्रकात तायडे, भगवान लघाणे प्रयत्न करत असल्याचे मोटे म्हणाले. 

सारंगपूर, नरसापूर हुरड्यासाठी प्रसिद्ध जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापूर ही गावे हुरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. कमी पाण्यात हलक्या जमिनीत हमखास उत्पादन देणारा सुरती व गुळभेंडी हुरडा ही या भागाची ओळख आहे. या पंचक्रोशीत सुमारे ११०० एकरवर हुरड्याचे पीक घेतले जाते. गंगापूर तालुक्यातील या पट्ट्यात पिकणारा हुरडा हा राज्याच्या सर्व भागांत विक्रीसाठी पोहोच केला जातो. हुरड्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रति किलो दर्जानुसार आहे. यातून कोटींची उलाढाल होताना दिसून येते.

वेगवेगळे प्रयोग करून दराबाबत हुरड्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वाडीलाल इंडस्ट्रीसोबत हुरडा फ्रोझन करण्याबाबत चर्चा सुरू आहे.  - ज्ञानेश्‍वर तारगे, तालुका कृषी अधिकारी, गंगापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price: कांदा निर्यात, कमी आवकेमुळे दरात सुधारणा; १० महिन्यांनंतर सरासरी भाव १५०० च्या पार

Herbicide Effect on Soil: तणनाशकाचे मातीवरील दुष्परिणाम काय; तणनाशक वापरताना काय काळजी घ्याल?

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर, संगमनेर मार्गे थेट असावा

CM Solar Scheme: दुष्काळी आटपाडीस सौर ऊर्जेचा आधार

Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशनात रस्त्यावर झोपणाऱ्या आंदोलकांसाठी दिलासा; उच्च न्यायालयाचे तात्पुरत्या निवाऱ्याचे आदेश

SCROLL FOR NEXT