मनोज जवंजाळ यांचा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.  
मुख्य बातम्या

निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातक्षम फळनिर्मिती हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन सुधारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन दया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

टीम अॅग्रोवन

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातक्षम फळनिर्मिती हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन सुधारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन दया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

वनामती येथील सभागृहात विदर्भ निर्यातक्षम संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, केळी, उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार गिरीश व्यास, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, वनामतीचे अतिरिक्‍त संचालक डॉ. उदय पाटील, अर्चना कडू, आयोजक तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्‍वर वानखडे, डॉ. डी. एम. पंचभाई, केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. विलास तांबे या वेळी उपस्थित होते. 

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत लाख रुपयांचे उत्पन्न होते म्हणून फळांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होते. मात्र एखाद्या हंगामात मागणी नसल्यास दरात मोठी घसरण होते. अशावेळी उत्पादन खर्चही निघत नाही; परिणामी नुकसान सोसावे लागते. असे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड न केल्यास हंगामात स्थानिकस्तरावर दर कमी असतील अशावेळी देशाच्या इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून जादा दर मिळविणे शक्‍य होईल. त्याकरिता तज्ज्ञांनी संपर्क वाढवावा, तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरील फळ उत्पादनक्षेत्रातील घडामोडींची माहिती विविध माध्यमांतून आत्मसात करावी.’’ 

डॉ. मायी यांनी देखील क्वांटिटी ऐवजी क्वालिटीवर लक्ष्य देण्याचे आवाहन केले. या वेळी रमेश जिचकार, मनोज जवंजाळ, प्रवीण ठाकरे यांच्यासह फळ उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT