प्रतिकात्मक छायाचित्र 
मुख्य बातम्या

शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वी

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ तर्फे वातावरणाला स्पर्शून जाणाऱ्या उल्केचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी ही महाकाय उल्का प्रशांत महासागरातील बेअरिंग समुद्रावरील आकाशात दिसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले. या उल्केमध्ये सुमारे १७३ किलोटन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद होती. या ऊर्जेची तुलना करायची झाल्यास दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर टाकलेल्या  अणुबॉम्बच्या दहा पट ठरेल ! वातावरणात विघटित झाल्यानंतर काही मिनिटांतच उल्केच्या शेपटीचे छायाचित्र टिपण्यात उपग्रहाला यश मिळाले होते. उल्केच्या घर्षणामुळे हवेतील तापमानात प्रचंड वाढ झाली. यामुळे आसपासच्या ढगांचा रंग नारंगी झाला होता. त्यामुळे नासाच्या ‘टेरा’ या उपग्रहाला छायाचित्र मिळवणे  सोपे झाले. अवकाशात लहान, मोठे खडकाचे तुकडे फिरत असतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच हवेच्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते. अशा खडकांच्या तुकड्यांना ‘उल्का’, असे म्हटले जाते. यापूर्वी अनेक उल्कापात झाले आहेत. रशियातील चेल्याबिंस्क शहरात २०१३ मध्ये उल्कापात झाला होता. ४४० किलोटनाच्या उल्केमुळे एक हजार ५०० लोक जखमी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Withdrawal: संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

Drought Assessment Team: दुष्काळी मदतीसाठी केंद्राचे पथक राज्यात

Drought Assessment: आज मराठवाडा, विदर्भात करणार पाहणी

Maharashtra Weather: मुंबईसह कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Central Team Visit : केंद्रीय पथक दुष्काळ पाहणीसाठी यवतमाळात येणार

SCROLL FOR NEXT