एकनाथ डवले
एकनाथ डवले 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचे शिवारच व्हावे कृषीविस्ताराचे मॉडेल ः डवले

टीम अॅग्रोवन

नागपूर ः कृषी विद्यापीठाच्या शेतातच दाखविण्यापुरते तंत्रज्ञान मर्यादित असल्याने शेतकरी त्यावर पुरेसा विश्‍वास ठेवत नाहीत. त्याकरिता उपलब्ध तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नेत त्याआधारे मॉडेल विकसित झाले तरच कृषीविस्ताराचा खरा उद्देश साध्य होईल. अशाप्रकारची कृषी विस्ताराची संकल्पना राबविण्यावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याची माहिती प्रभारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

जलसंधारण विभागाचे सचिव असलेल्या एकनाथ डवले यांच्याकडे कृषी खात्याच्या अपर सचिव पदाचा प्रभार देण्यात आला आहे. श्री. डवले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कृषी विस्तारांच्या संकल्पनांमध्ये बदल करण्याची गरज मांडली.

ते म्हणाले, की राज्यात कृषी विद्यापीठाद्वारे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान तसेच वाण विकसित केले जातात. परंतु, वाणाचे प्रात्याक्षिक आणि नवीन अवजारांचे सादरीकरण केवळ विद्यापीठ प्रक्षेत्रापुरतेच मर्यादित राहते. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहिती व्हावे, याकरिता कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यास दौरे आयोजित होतात. परंतु, अशा अभ्यास दौऱ्यातून कृषीविस्ताराचा उद्देश साध्य होत नाही. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या शेतात पाहिल्याशिवाय शेतकरी अशा तंत्रज्ञानावर विश्‍वास ठेवत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वापरावर मर्यादा आल्या आहेत.

कृषीविस्ताराला गती देण्याकरिता सद्याच्या प्रचलीत पद्धतीत बदलाची गरज आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञानाचे मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याचे प्रस्तावीत आहे. अशाप्रकारचे मॉडेल मग कृषी विस्ताराच्या उद्देशाने अभ्यास दौऱ्याअंतर्गत दाखविले जातील. अकोल्यातील जय गजानन शेतकरी मंडळाने कापूस शेती यांत्रिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प कृषी विस्ताराला गती देणारा आहे. अशाप्रकारचे मॉडेल विकसित होण्याची गरज श्री. डवले यांनी मांडली. जलसंधारण, कृषी विभाग स्वतंत्र करण्याबाबत हालचाली सुरू जलसंधारण आणि कृषी विभाग स्वतंत्र होणार होते. त्या संदर्भाने शासनस्तरावर हालचाली सुरु असून जलसंधारणमधील अभियांत्रीकी शाखा पूर्णपणे वेगळी झाली आहे, अशी माहिती एकनाथ डवले यांनी दिली. कृषी विभागातील आकृतीबंधाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT