The 'e-claim' system for account holders
The 'e-claim' system for account holders 
मुख्य बातम्या

खातेदारांच्या नोंदीसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली

टीम अॅग्रोवन

नगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, विश्‍वस्तांचे नाव बदलणे आदी आठ प्रकारच्या फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरणांतर्गत ई-हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रणालीमुळे खातेदारांना वेगवेगळ्या हक्काच्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकपणा येणार आहे. खातेदारांच्या वेळ, अनाठायी पैशांची बचत होणार आहे. 

खातेदाराला तलाठी कार्यालयाकडे सात-बारावर हक्‍काच्या नोंदी फेरफारच्या स्वरूपात घेण्यासाठी अर्ज करावे लागतात. यापुढे ते अर्ज ऑनलाइन दाखल करता येतील. प्रणालीचा वापर खातेदारांसह बॅंका, सहकारी सोसायट्या, पतसंस्थांनादेखील वापरता येईल. त्यासाठी बॅंक प्रतिनिधी, सोसायटी सचिव व खातेदार यांना hpps:// pdeigr.maharashtrs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. 

पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करताच खातेदाराला अर्जाच्या प्रतीसह संकेतांक क्रमांक मिळेल. त्या आधारे अर्जाची स्थितीही पाहता येणार आहे.

ई-हक्‍क प्रणालीद्वारे खातेदाराचा अर्ज तलाठ्यांना ई-फेरफारमध्ये प्राप्त करता येऊन फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आली आहे. प्रणालीच्या वापरामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्‍चित मदत होणार आहे.  - ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT