वादळी पावसामुळे  ऊस उत्पादकांचे लाखोंचे नुकसान  Due to heavy rains Loss of millions of sugarcane growers 
मुख्य बातम्या

वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे नुकसान 

संततार पाऊस, वादळाचा रुद्रापूर, कोपरा, परसोडा शिवारातील ऊस पीकाला फटका बसत लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा रुद्रापूर, कोपरा, परसोडा शिवारातील ऊस पीकाला फटका बसत लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.  जिल्ह्यातील काही भागात सिंचनाच्या सुविधा असून, त्या भरवशावर शेतकऱ्यांद्वारे व्यवसायीक व नगदी पिके घेतली जातात. आर्णी तालुक्‍यातील शेतकरी उसाची देखील लागवड करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यासोबतच सोसाट्याचा वारा देखील सुटत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे. रुद्रापूर शिवारातील आरुष मारबते यांनी दहा एकरावर उसाची लागवड केली आहे. वादळामुळे त्यातील सहा एकरावरील उसाचे नुकसान झाले. पाच ते सहा लाख रुपयांची हानी यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. परसोडा शिवारातही ऊस उत्पादकांना वादळाचा फटका बसला. छाया अरुण कदम यांचा पाच एकरावर ऊस आहे. यातील अडीच एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोपरा शिवारात तुळशीराम भायमारे यांच्या शिवारालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पाचपैकी दीड एकरातील ऊसाला फटका बसला. या नुकसानीची प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

प्रतिक्रिया 

माझ्या शेतालगत असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे कपाशी, सोयाबीन व उसाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून अद्याप सर्व्हेक्षण व पंचनामा करण्यात आला नाही. त्या संदर्भाने आदेश व्हावे, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाकडून ही बाब किती गांभीर्याने घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.  तुळशीराम भायमारे, शेतकरी, कोपरा, ता. आर्णी.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Soybean Price: सोयाबीनच्या तेजीमागे दुष्काळ की साठेबाजी ?

Indian Politics: ‘एसआयआर’विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Torrent Project Controversy: ‘टोरंट’ वादळ

Sugarcane Price Announcement: ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी; ऊसदर संघर्ष समितीचा इशारा

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

SCROLL FOR NEXT