Due to the disease, the standing crop of the trumpet began to wither
Due to the disease, the standing crop of the trumpet began to wither 
मुख्य बातम्या

मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागले

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून खरिपाच्या विविध पिकांचे नुकसान झाल्यानंतर तुरीच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीवर यंदाही संकट आले आहे. मागच्या वर्षाप्रमाणे उभे पीक वाळत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तुरीचे पीक बहरात असताना त्यावर मर रोग व अळीचा प्रादुर्भाव झाला.  

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी या पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. जिल्ह्यात सत्तर ते ऐंशी हजार हेक्टरवर तुरीचे पीक घेतले जाते. सर्वच तालुक्यांत तुरीचे पीक घेत असले तरी मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, कंधार व लोहा तालुक्यांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही शेतकरी तुरीला सिंचनाखाली आणून उत्पादन घेतात. 

यंदाही खरिपातील अनेक पिके गेली तरी तुरीचे उत्पादन घेऊन आधार मिळवतात. परंतु या वर्षी हे पीक उभे वाळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक भागांत अशाच प्रकारे किडी- रोगांचा प्रादुर्भाव होऊन तुरीचे पीक गेले होते. यंदा पिकावर दोन ते तीन फवारण्या केल्यानंतर ऐन बहरातील पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. याबाबत कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

मागच्या सालातही तुरीचे पीक उभे वाळले होते. या वर्षीही तसेच होत आहे. यामुळे तूर काढणीचेही काम शिल्लक राहिले नाही. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.  - बालाजी भरकडे, शेतकरी, कापसी बुद्रूक, ता. लोहा

खोडावर ठिपके, भेगा पडून मुळांकडे अन्नद्रव्य रोखणारा बुरशीजन्य मर रोग तुरीवर आहे. तो पसरू नये यासाठी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात एक ग्रॅम मिसळून खोडावर फवारणी करावी. - प्रा. अरविंद पांडागळे, कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन केंद्र, नांदेड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT