संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कुलगुरू निवड : सर्वांच्या नजरा राजभवनाकडे

Gopal Hage

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी शुक्रवारी (ता.१५) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर पाच उमेदवारांनी सादरीकरण केले अाहे. या पदावर अाता कोणाची वर्णी लागते की निवड प्रलंबित ठेवली जाते, हा निर्णय राज्यपाल जाहीर करणार असल्याने सर्वांच्या नजरा राजभवनाकडे लागल्या अाहेत.

यासंदर्भात सूत्रांशी संपर्क साधला असता, ‘अद्याप काही नाही. जे काही जाहीर करायचे त्याची माहिती देऊच’ एवढेच उत्तर मिळाले. डॉ. रविप्रकाश दाणी यांचा १२ अाॅगस्टला कार्यकाळ संपला. त्यांना या पदावरून मुदतीपूर्वीच राज्यपालांनी पदमुक्त केले होते.

नवीन कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कुलगुरू शोध समितीचे गठण करून पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कुलगुरू शोध समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश हेमंत एल. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली काम करीत होती. या समितीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक त्रिलोचन महापात्र आणि राज्याचे कृषी व पणन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार या दोन सदस्यांचा समावेश होता.

या समितीकडे २२ पात्र व्यक्तींनी अर्ज केले होते. त्यातून अंतिम पाच जणांना राजभवनात सादरीकरणासाठी बोलविण्यात अाले. यात येथील कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. विलास भाले यांच्यासह इतर चौघांचा समावेश होता. या पाच जणांनी शुक्रवारी राजभवनात सादरीकरण केल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यानंतर कुठलीही घोषणा झालेली नसल्याने सर्वांच्या नजरा राजभवनाच्या घोषणेकडे अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT