डाॅ. अनिल बोंडे  
मुख्य बातम्या

एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती : कृषिमंत्री डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन

मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात येत असून, ही समिती महामंडळाच्या विकासासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करेल व त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी दिले. मंत्रालयात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळा (एमएआयडीसी)च्या कामकाजाबद्दल कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी, खाद्य प्रक्रिया व रिक्त पदे याबाबतचा आढावा घेण्यात आला. कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, या त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीमध्ये निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कृषी उद्योग क्षेत्रातील अनुभव असणारी व्यक्ती व कृषी अन्न व खाद्य प्रक्रियेतील अनुभवी व्यक्ती यांचा समावेश करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत संत्र, आंबा, अननस व टोमॅटो यांच्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांना कॅन्टीन स्टोअर्स, एअर इंडिया, वेगवेगळ्या तारांकित हॉटेल्स, शासकीय संस्था तसेच खुल्या बाजारात प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर महामंडळामार्फत खते, कीटकनाशके यांसारखी कृषी उत्पादके व यंत्रसामग्री उत्तम दर्जात व वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी व महामंडळाचा सार्वत्रिक विकास करण्यासाठी ही समिती नेमण्यात येणार असू,न त्याचा शेतकऱ्यांना व महामंडळाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. बैठकीस महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक करंजकर, संचालक सी. आर. लोही तसेच कृषी विभागाचे व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT