kaneri math
kaneri math 
मुख्य बातम्या

कणेरी मठाचे कार्य प्रेरणादायी: डॉ. ए. के. सिंग

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: ‘‘देशातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कणेरी मठ व कृषी विज्ञान केंद्राने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. असे उपक्रम सर्वत्र व्हावेत,’’ अशी अपेक्षा भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कृषी विस्तार उपसंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी गुरुवारी(ता.३०) कणेरी (ता. करवीर) येथे व्यक्त केली. येथील कणेरी मठात देशभरातील वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे तीन दिवसीय ‘कृषी नवोत्थान २०२०’ कृषक संमेलनाचे उद्घाटन डॉ. सिंग यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. डॉ. सिंग म्हणाले, ‘‘आज शेतकरी विविध कारणांमुळे अडचणीत येत आहेत. त्याला दिशा देण्याची गरज आहे. यासाठी कणेरी मठाचे सुरू असणारे प्रयत्न दिशादर्शक ठरतील.’’  कृषी विज्ञान केंद्राने प्रक्रिया उद्योगाअंतर्गत सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या पन्नासहून अधिक पदार्थांचे उद्घाटन या वेळी झाले. कणेरी मठावरील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. ‘‘या शिबिरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि माहिती यावर डॉक्युमेंटरी बनवली जाणार असून हे अनुभव देशातील सर्वच राज्यात त्या त्या भाषेत पुस्तकाच्या रूपात भाषांतर करून पोचवले जाणार आहे,’’ अशी माहिती कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली. शिबिरात शाश्वत शेतीसाठी पर्यायी शेती प्रणाली यामध्ये देशी गाय संगोपन, मातीचे आरोग्य, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा बनवण्याच्या पद्धती आणि नैसर्गिक पद्धतीने वनस्पती संरक्षण या विषयावर चर्चा होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी तांत्रिक पर्याय, शेतमालावर प्रक्रिया, निर्यात आणि बाजारपेठ यावर चर्चा होणार आहे. उद्योजकता विकास आणि प्रोत्साहन यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मशरूम, मधुमक्षिका, मत्स्य, शेळी, मेंढी व कुकुटपालन अशा विषयांवर विचारमंथन मठाच्या हॉल मध्ये सुरू आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे चेअरमन वल्लभभाई कथीरिया, डॉ. एन. एस. राठोड (राजस्थान), धारवाड कर्नाटक यु. ए. एस. चे कुलगुरू डॉ. एम. बी चेट्टी, डॉ. एस.ए. पाटील, डॉ. ज. प्र. शर्मा, डॉ. या. रा. मीना, डॉ. लाखण सिंह उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT