down the 'Siddheshwar' chimney in three days: Dr. Bhosle 
मुख्य बातम्या

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन दिवसांतच पाडा : डॉ. भोसले

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करू, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. परंतु, चिमणी हटविण्याचे काम तीन दिवसांमध्येच पूर्ण करावे लागेल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ठेकेदाराला केली आहे. चिमणी हटविण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही डॉ. भोसले यांनी ठेकेदाराला केली. 

चिमणी हटविण्यासाठी आवश्‍यक असलेले कामगार हे उत्तर प्रदेशातील असून, त्यांचे २२ कामगारांचे पथक असणार आहे. सोलापूरच्या गड्डा यात्रेसाठी आपल्याकडे अद्यापपर्यंत मैदानाची मागणी झालेली नाही. मागणी झाल्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. महसूल वसुलीचे दिलेले उद्दिष्ट डिसेंबरमध्येच पूर्ण करण्याची सूचनाही डॉ. भोसले यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली. 

पालखी मार्गाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी आवश्‍यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याचीही सूचना डॉ. भोसले यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्यात आले असून, इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्यात आले आहेत. याबाबतची केंद्र सरकारची सुधारित अधिसूचना अद्यापही प्रसिद्ध न झाल्याने गौण खनिजासाठी मान्यता देता येत नाही. अनधिकृत गौणखनिज उपसा करणाऱ्यांवर पाचपट दंड आकारण्याची तरतूद असून, यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT