Distribution of Rs. 46 crore to farmers affected by heavy rains in Ratnagiri district
Distribution of Rs. 46 crore to farmers affected by heavy rains in Ratnagiri district 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना ४६ कोटींचे वितरण

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले होते. त्यातील नुकसानग्रस्तांना मदतीपोटी शासनाकडून ५० कोटी ७६ लाख रुपये प्राप्त झाले. आतापर्यंत ४६ कोटी २५ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. यामध्ये शेतजमीन, शेती आणि कुक्कुट शेडच्या नुकसानीपोटी ४ कोटी ४ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूण, खेड तालुक्यांना बसला होता. वाशिष्ठी, जगबुडी नदी किनारी असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरडी कोसळून भातशेतीसह काही घरांचे नुकसान झाले. चिपळूण शहर दोन दिवस पाण्याखाली होती. हजारो घरे यामध्ये बाधित झाली होती. यामध्ये १३ हजार हेक्टर शेती, बागायतीचे नुकसान झाले. तसेच १ हजार हेक्टरवरील शेत जमिनी गाळ साचल्यामुळे बाधित झाली होती. 

तत्काळ मदत म्हणून राज्य सरकारने पाच हजार रुपये वितरित केले. त्यानंतर दोन महिन्यांनी शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष जाहीर केले. त्यामध्ये दुकाने, टपऱ्या आणि कुक्कुटशेडसाठी मदतीचा समावेश केला. मृत व्यक्तींच्या वारसांना तत्काळ मदत वाटप सुरु झाली. आतापर्यंत २६ कोटी ५२ लाखांपैकी २३ कोटी १६ लाखाचे वितरण झाले. कच्ची, पक्की घरांचे नुकसान झालेल्यांमध्ये ७ कोटी ६४ लाख मंजूर आहेत. त्यातील ३ कोटी ३५ लाख रुपये वाटप झाले आहेत. उर्वरित रक्कमेचे वितरण प्रशासनाकडून करण्यात येणार  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT