संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती विकसित करण्याबाबत चर्चा

टीम अॅग्रोवन

नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. मात्र, अलीकडच्या काळात स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, कृषी विभाग, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने ओझर मिग येथील द्राक्ष बागायतदार संघ कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती विकसित करण्याबाबतच्या मुद्द्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाली.   

सद्यःस्थितीत अनियंत्रित व असंघटित व्यापारामुळे द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण विस्कळित झाले आहे. यावर मान्यवरांनी आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. मोगल होते. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी या संकल्पनेवर सादरीकरण केले. या वेळी ते म्हणाले, की स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षांसंबंधी अडचणी येत आहेत. काळाची पावले ओळखून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन व द्राक्ष पिकाची मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याच्या हेतूने उत्पादन, तंत्रज्ञान, नवीन वाण, ब्रँडिंग तसेच मागणी व पुरवठा यांवर काम करावे लागेल.  

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ म्हणाले, की द्राक्ष व्यवसायात मार्केटिंग व निर्यात प्रक्रियेत सदैव सहकार्य असेल. या अभियानाकडे शासकीय योजना म्हणून बघू नका, ज्या ठिकाणी कृषी विभागाची मदत लागेल त्या ठिकाणी कृषी विभाग सोबत राहून क्रियाशीलरीत्या काम करेल.कृषी विभागातर्फे ‘मॅन्युअली’ गावनिहाय द्राक्षांच्या वाणांसह क्षेत्राचे संकलन करून ‘ॲप’ विकसित करण्याचे या वेळी ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून लागवडीखालील द्राक्ष क्षेत्राचे जिओ टॅगिंग करण्यात येईल. त्या माध्यमातून लागवडीखालील क्षेत्राचा आढावा, विविध द्राक्षवाण व त्यांचे क्षेत्र याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील योजना ठरविली जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. जिल्ह्यानंतर तालुका पातळीवर याबाबत काम करण्यात येणार आहे. 

द्राक्षाचे मार्केटिंग, विमा, व्यापार व इतर बाबी तसेच तांत्रिक अडचणींवर मात करणे ही काळाची गरज असल्याने या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांची मते जाणून घेतली गेली. जिल्ह्यातील द्राक्षांचा विश्वासार्ह ब्रँड तयार करण्यासाठी उपस्थित तरुण द्राक्ष उत्पादकांनी आगामी काळात काम करण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

बैठकीसाठी बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, आत्मा नाशिकचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, हेमंत काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण मोरे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT