संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीतील विकासकामांना दसऱ्यानंतर सुरवात : देशमुख

टीम अॅग्रोवन

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण आणि विविध विकासकामांना पणन संचालकांनी मान्यता दिली आहे. काही कामांचे कंत्राट देण्यात आले असून, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू अाहेत. या विविध कामांना दसऱ्यानंतर प्रत्यक्ष सुरवात हाेईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

शनिवारी (ता. २९) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशमुख यांनी ही माहिती दिली. विविध विकासकामांमध्ये भाजीपाला आणि केळी विभागातील रस्त्यांचे डांबरीकरणासाठी ७ काेटी १२ लाख, गुळ भुसार विभागातील रस्त्यांसाठी ७ काेटी ९६ लाख, भुसार विभागातील सर्व्हिस लेनमधील वीज आणि पाणी वाहिन्यांच्या डक्टसाठी ८ काेटी, जनावरे बाजाराच्या संरक्षक भिंतीसाठी ७३ लाख ९१ हजार रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामधील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दसऱ्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरवात हाेणार आहे.

बाजार आवारातील पाण्याचा वाढता वापर लक्षात घेत जुनी टाकी पाडून नवीन टाकी उभारण्यासाठी देखील मान्यता मिळाली असून २५ हजार लिटरएेवजी आता नवीन २५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. आहे. यासाठी २ काेटी ५४ लाखांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या टाकीचे काम पूर्ण हाेईपर्यंत पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणुन बाजार समितीच्या लगत चार दिशांना नवीन पाणी जाेड महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.

तसेच बाजार आवारात नव्याने ११ स्वच्छतागृहे आणि ११ पाणपाेई उभारण्यात येणार आहे. खेड शिवापूर येथील जागेवर २७ काेटी ५४ लाखांचा प्रतवारी, पिकवण गृह उभारणीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तातडीने काम सुरु केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले.

आपला बाजार स्वच्छ बाजार अभियान राबवणार पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या आवाहनानुसार २ आॅक्टाेबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आपला बाजार स्वच्छ बाजार अभियान राबविण्यात येणार आहे. बाजारातील सर्व घटक, संघटना यामध्ये सहभागी हाेणार असून सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सर्व विभागात स्वच्छता करण्यात येणार आहे.

बाजार शुल्कात ३ काेटी ४६ लाखांनी वाढ गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीच्या बाजारशुल्कात ३ काेटी ४६ लाखांनी तर एकूण उत्पन्नात ३ लाख ५४ लाखांनी वाढ झाली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT