देवसाने प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत आणा :  भुजबळ
देवसाने प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत आणा : भुजबळ 
मुख्य बातम्या

देवसाने प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत आणा : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक  : देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या भिंतीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहिले तर काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित करत येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करा, येत्या पावसाळ्यातच देवसाने मांजरपाडा पाणी डोंगरगावपर्यंत आणा, अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आयोजित बैठकीत दिल्या. पुणेगाव ते दरसवाडी हा ६३ कि.मी.चा पाण्याचा प्रवास चाचणी वेळेस अतिशय अडचणीतून झाला. पाण्याची अनेक ठिकाणी गळती आहे. काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे, पण त्या अगोदर तत्काळ पाणी गळती होणार नाही यावर उपाययोजना करा. १ ते २५ कि.मी.मधील रुंदीकरणाचे राहिलेले काम लवकर पूर्ण करा. तसेच वणी येथील बोगदा रुंदीकरण काम लवकर सुरू करून पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पूर्णतः २२० क्युसेकने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा, असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.  दरसवाडी ते बाळापूर हा ४० कि.मी. पाणी प्रवासदेखील खूप अडचणीत झालेला आहे. १५४ क्युसेक कालव्यामध्ये फक्त ५० क्युसेक पाणी प्रवाहित होते. हा कालवा पूर्णपणे १५४ क्युसेकने प्रवाहित झाला पाहिजे. केदराई ते दरसवाडी ६ कि.मी. कालवा दुरुस्त केल्यास तसेच काळलवन, जोपूळ नदीचे पाणी दरसवाडी धरणात वळवल्यास धरण लवकर भरण्यास मदत होईल व पाणी लवकर सोडता येईल, असे मोहन शेलार यांनी निदर्शनास आणून देताच यावर कार्यवाही करून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी केल्या. या वेळी मुख्य अभियंता  किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांसह दिलीप खैरे, सुनील पैठणकर व येवला तालुक्यांतील शेतकरी उपस्थित  होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT