शेतकऱ्यांना उद्योजक करण्याचा भारत कृषक समाजाचा निर्धार
शेतकऱ्यांना उद्योजक करण्याचा भारत कृषक समाजाचा निर्धार 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना उद्योजक करण्याचा भारत कृषक समाजाचा निर्धार

टीम अॅग्रोवन

अकोला : भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष, पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषक समाजातर्फे टाकळी निमकर्दा येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला.  

समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

डाॅ. मानकर म्हणाले, ``शेतकऱ्यांनी कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता स्वबळावर शेतीसोबत पूरक व्यवसाय उद्योगधंदे करावेत. डेअरी, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीमशेती, दाळमिल, ऑइलमिल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कुठलाही उद्योग सुरू करून स्वतः उद्योजक व्हा. त्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल.`` 

उपसरपंच अक्षय साबळे, माधव भारसाकळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शेषराव पाटील चिखलीकर, रामेश्‍वर माळी, रवींद्र वानखडे, रामधन कुकडे, महादेव साबळे, प्रकाश साबळे, गणेशराव किनेकर, अशोक साबळे, गौरव साबळे, धीरज साबळे, विठ्ठल साबळे, संजय मगर, सागर साबळे, प्रदीप साबळे, सारंगधर डिवरे, प्रवीण साबळे यांच्यासह इतर गावकरी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT