Dhan
Dhan  
मुख्य बातम्या

धान खरेदीत मोठी अनियमितता

टीम अॅग्रोवन

गोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रब्बी हंगामातील धान खरेदी मोठी अनियमितता झाल्याचा खुलासा खुद्द चौकशी समितीने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भातील अहवाल सादर करण्यात आला असून सातबाराच्या झेरॉक्सवरच धान खरेदी झाल्याचे यात नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात ५७ लाख क्विंटल धान खरेदी केली. कृषी विभागाने धान लागवड क्षेत्र  आणि उत्पादकता याच्या सरासरीपेक्षा किती तरी पट अधिक खरेदी झाली. परिणामी छत्तीसगड तसेच मध्यप्र देशातील धानाची जिल्ह्यातील केंद्रावर विक्री झाल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळत होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशीची मागणी होऊ लागली.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर  अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने पंधरा दिवस चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात धान्य खरेदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया तालुक्यातील धान्य खरेदी केंद्रावर उत्पादनापेक्षा एक ते दीड लाख क्विंटल अधिक खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीत नियमितता असावी यासाठी कोणत्या केंद्रावर किती गाव सलग्न असतील हे ठरवून देण्यात आले होते. मात्र, खरेदी केंद्रांना जी गावे जोडून देण्यात आली होती. त्या गावा व्यतिरिक्त इतर गावातील, तालुक्याबाहेरील गावातून धान खरेदी करण्यात आली. सातबारावर तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करून धानाची विक्री करण्यात आली. ज्यांच्या शेतात धान लागवड नव्हती त्यांचाही सातबारा धान विक्रीसाठी जोडण्यात आला. सातबाराच्या झेरॉक्सवर देखील मोठ्या प्रमाणावर धानाची खरेदी करण्यात आली. सातबारावर सिंचनाची नोंद करीत वाढीव उत्पादकता असल्याचे भासवत या माध्यमातून देखील प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. चौकशी समितीच्या पाहणीत हे सारे गैरप्रकार उघड झाले असून समितीने आपला १५ पाणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आता  जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका सातबारावर अनेक ठिकाणी विक्री सातबारा असल्याशिवाय धान विक्री करता येत नाही. मात्र, काही व्यापाऱ्यांनी बनावट सातबारा तयार करून त्याच आधारावर अनेक केंद्रावर धानाची विक्री केली, असेही चौकशीत समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT