ब्रह्मगव्हाणच्या कामासाठी डेरा आंदोलन
ब्रह्मगव्हाणच्या कामासाठी डेरा आंदोलन 
मुख्य बातम्या

ब्रह्मगव्हाणच्या कामासाठी डेरा आंदोलन

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग दोनचे उर्वरित काम ३० मेपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा अधीक्षक अभियंता औरंगाबाद पाटबंधारे मंडळ औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर डेरा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

या संदर्भात कडू यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना २४ एप्रिलला पत्र दिले आहे. त्यानुसार पैठण तालुक्‍यातील  ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे ८० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरित काम होत नसल्याने या योजनेमुळे ज्या खेर्डा प्रकल्पात पाणी येणे शक्‍य होते त्या प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा सुकल्या आहेत. पाच शेतकऱ्यांनी पाणी नाही म्हणून आत्महत्या केल्या. तरीही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

योजना पूर्ण होत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे  हे काम सुरू करावे, अशी कडू यांची मागणी आहे. या संदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग क्र. १ औरंगाबाद यांचे १ जानेवारी २०१९ चे पत्रही जोडले आहे. 

कामात लक्ष घाला ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली. पैठण तालुक्‍यातील ५५ गावांना १६ हजार हेक्‍टर जमिनीस पाणीपुरवठा करणारी ही योजना २००९ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केली. त्यासाठी २२२ कोटी रुपये दिले. परंतु गत दहा वर्षांत योजनेची कामे सुरू करावे म्हणून ३० वेळा आंदोलने केली. त्यामुळे योजना सुरू राहून बऱ्याच अंशी मार्गी लागली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्‍त बैठक घेऊन योजनेच्या कामात स्वत: लक्ष घालण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT