chicken center  
मुख्य बातम्या

चिकनच्या मागणीत हलकी वाढ; दरात सुधारणा 

गेल्या बुधवारपासून किरकोळ विक्री हळूहळू वाढत गेली. जे ग्राहक कमी झाले होते, त्यांच्यात पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत सकारात्मक मागणी वाढली. नाशिक, पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढती असल्याने आशादायी चित्र आहे. - श्रीकृष्ण गांगुर्डे, एव्ही ब्रॉयलर्स, नाशिक

टीम अॅग्रोवन

नाशिक : चिकन व कोरोनाचा थेट संबंध नसताना गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावरील अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत या व्यवसायाचे कोटींचे नुकसान झाले असतानाच, चिकनच्या मागणीत हळूहळू वाढ होत असून, दरातही हलकी सुधारणा झाली आहे. 

रविवारच्या (ता. २२) जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. २१) चिकनच्या मागणीत आणि दरात वाढ हलकी सुधारणा झाल्याची माहिती पोल्ट्री उद्योगातील सूत्रांनी दिली.  ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, महिन्यात साडेचार कोटी ब्रॉयलर कोंबडी उत्पादन, तर नाशिक जिल्ह्यात महिन्याला दीड कोटी कोंबड्यांचे उत्पादन होते. मात्र कोरोनाच्या अफवांमुळे मागणी घटल्याने मोठ्या नुकसानीला या उद्योगाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात या उद्योगातील अर्थकारण कोलमडले आहे. अशातच शनिवार (ता. २१) चिकन विक्री केंद्रावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे मागणीत वाढ झाल्याचे सकारात्मक परिस्थिती या उद्योगासाठी तयार होत आहे. तसेच ग्राहकांच्या मनातील चिकन व कोरोनाबाबतचा संभ्रम कमी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आहारात चिकन घेण्याबाबत भीती कमी होऊन उठाव झाल्याचे पाहायला मिळाले. 

गेल्या दीड महिन्यात मागणी नसल्याने चिकन प्रतिकिलो कमीत कमी ३ रुपये दराने किलोपर्यंत नीचांकी विक्री झाली. त्यामुळे बाजारात मागणी वाढल्याने जिवंत पक्षी सध्या  २५ ते ३० रुपयांपर्यंत दराने विक्री झाली, थेट चिकन विक्री प्रतिकिलो ३० ते ४५ रुपयांपर्यंत, तर काही ठिकाणी ६५ रुपयांपर्यंत विक्री झाली. त्यामुळे आजही उत्पादन खर्चाच्या तुलनेत सर्वसाधारण ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी मागणी मंदावल्याने विक्रीयोग्य तयार कोंबड्या मोठ्या प्रमाणावर शेडमध्ये पडून होत्या. त्यापैकी संभ्रम कमी झाल्याने ४० टक्के खपला आहे, उर्वरित ६० टक्के माल अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अशीच मागणी कायम राहिल्यास उर्वरित मालाचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. पुढील काळात शासनाने अत्यावश्यक बाबीत चिकन, अंडी विक्रीसाठी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

सध्य विक्री व दर स्थिती :  प्रतिपक्षी प्रतिकिलोसाठी उत्पादन खर्च : ७५ रुपये  झालेला जिवंत पक्षी दर प्रतिकिलो (ता. २१ रोजी) : २५ ते ३०  चिकन विक्री दर : ३० ते ४५ रुपये 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : ट्रॅक्टर विक्रीने १० लाखांचा टप्पा ओलांडला; निर्यात एका लाखांच्या पार

Agrowon Samvad: ‘जमीन आरोग्य आणि पीक व्यवस्थापन’ विषयावर घाटनांदूरला बुधवारी चर्चासत्र

Turmeric Price Trend: जोखीम व्यवस्थापनासाठी वायदे बाजार आवश्यक

Agriculture Award: भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

India Agriculture Growth: भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ, चीनला मागे टाकले- नीती आयोग

SCROLL FOR NEXT