Demand for 2 lakh 62 thousand tons of fertilizers in Nanded district
Demand for 2 lakh 62 thousand tons of fertilizers in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात दोन लाख ६२ हजार टन खतांची मागणी

टीम अॅग्रोवन

नांदेड : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खताची कमतरता पडू नये, या साठी कृषी विभागाने जिल्ह्यात लागणाऱ्या दोन लाख ६२ हजार १९५ मेट्रिक टन खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली. या पैकी दोन लाख ९ हजार ४० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील ९२ हजार टन खत शिल्लक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ - २२ साठी लागणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी पुण्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली जाते. यात लागणारा रासायनिक खत तसेच शिल्लक खताची ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी पाठवले जाते. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात आठ लाखांवर आठ लाख हेक्टरवर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या साठी लागणारे बियाणे तसेच खताचे नियोजन प्रशासनाद्वारे कृषी विभाग मागील एका महिन्यापासून करत आहे.

यंदा जिल्ह्यात विविध प्रकारच्या दोन लाख ६२ हजार १९५ मेट्रिक टन खताची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने कळविले होते. यानुसार पुण्याच्या कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख ९ हजार चाळीस टन आवंटन मंजूर केले आहे. मागील हंगामात २ लाख २ हजार ४२० टन खताचा वापर झाला होता. यातील ९२ हजार ४६५ मागील खत शिल्लक राहिले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खतांची कमतरता पडणार नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक रवीकुमार सुखदेव यांनी दिली. 

मागणी केलेला व मंजूर खतसाठा 

युरिया ८० हजार टन, तर मंजूर ६७ हजार टन, डीएपी ४८ हजार टन, तर मंजूर ४१ हजार ११० टन, एमओपी १७ हजार टन, तर मंजूर १७ हजार ११० टन, एसएसपी मागणी तीस हजार टन, तर मंजूर २८ हजार ८४० टन, एनपीके मागणी ८७ हजार १९५ टन, तर मंजूर ५४ हजार ५५० टन अशी जिल्ह्यात एकूण दोन लाख ६२ हजार १९५ टनांची मागणी केली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख ९ हजार नऊ हजार ४० टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील ९२ हजार ४६५ टन खतसाठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT