Damage to agricultural crops due to rain in Satara 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान

कऱ्हाड, जि. सातारा ः दोन दिवसांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसासह गारांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एेन काढणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा ः दोन दिवसांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसासह गारांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एेन काढणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. 

‘कोरोना’मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात उपलब्ध असलेला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यास धडपडत आहेत. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत आणता न आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रव्यूव्हात सध्या शेतकरी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात वादळी वारा व गारांसह होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली आंबा, कलिंगड, फणस यासह दोडका, काकडी, टोमॅटो, कारले, पिके वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या काढणीच्या हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. 

शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी  लॉकडाऊनने शेती पिके धोक्यात आली आहेत. त्यातच वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोडणीस आलेली भाजीपाल्याची व पालेभाज्यांची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातून सावरण्यासाठी शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या, फळांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत  आहे.

वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. त्यामध्ये दोडका, कलिंगड, आंब्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकाने आम्हाला भरपाई द्यावी.  - धोंडीराम कोळेकर, शेतकरी, कळकेवाडी, सातारा  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT