Dam stock in Nashik district at 46%
Dam stock in Nashik district at 46% 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन

नाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा अवघ्या २९ टक्क्यांवर आला होता. मात्र रविवार (ता.१८) पासून पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा ४६ टक्क्यांवर गेला आहे.

मंगळवार (ता.२७) अखेर १७ टक्के वाढ दिसून आली. तर जिल्ह्यातील भावली धरण १०० टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहाचे मुख्य पाणलोट क्षेत्र त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. त्यामध्ये गंगापूर, कश्यपी, गौतमी, गोदावरी व आळंदी या धरणांचा समावेश आहे. या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे समूहाचा पाणीसाठा ५९ टक्क्यांवर आला आहे.

पालखेड धरण समूहातील धरणांत  पाणीसाठा घटला होता. मात्र पावसाने कृपा केल्याने हा जलसाठा ५४ टक्क्यांवर गेला आहे. तर पावसाअभावी पुणेगाव, तिसगाव धरणे कोरडी आहेत. या भागाचे मुख्य पाणलोट क्षेत्र दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात आहे. येथे झालेल्या जोरदार पावसामुळे वाघाड धरणाचा टक्का ३० वर गेला आहे. 

इगतपुरीमध्ये पावसाने जोर धरल्याने दारणा, भावली, वालदेवी धरणात पाणी साठा वाढला आहे. त्यापैकी भावली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील उत्तर पूर्व भागातील गिरणा धरण समूहातील हरणबारी धरणाच्या पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. तर माणिकपुंज, पुनद धरणात हळूहळू वाढ होत आहे. तर नागासाक्या धरण कोरडे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा या मोठ्या धरण समूहात पाणीसाठा ४६ टक्क्यांवर गेला आहे.

‘दारणा, भावली’तून विसर्ग सुरू 

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याचा येवा कायम आहे. त्यामुळे या दारणा धरणातून ३१९७ क्यूसेक, तर भावली पूर्ण भरल्याने येथून २०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत ४९७१ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT