ताकारीच्या पाण्यासाठी शेतकरी-कर्मचाऱ्यांत दररोज बाचाबाची
ताकारीच्या पाण्यासाठी शेतकरी-कर्मचाऱ्यांत दररोज बाचाबाची 
मुख्य बातम्या

ताकारीच्या पाण्यासाठी शेतकरी-कर्मचाऱ्यांत दररोज बाचाबाची

टीम अॅग्रोवन

सांगली ः ताकारी उपसा योजनेच्या लाभक्षेत्रात गतवर्षी पडलेला अत्यल्प पाऊस, त्यामुळे जमिनीतील खालावलेली पाणीपातळी आणि दरवर्षीपेक्षा यंदा जास्त कडाक्याचा उन्हाळा यामुळे या वर्षी ताकारी पाण्यावर प्रचंड ताण पडत आहे. योजनेचे अधिकारी व कर्मचारी एकावेळी सर्वांनाच पाणी देऊ शकत नाहीत. परिणामी पाणी कमी पडत असलेल्या भागातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांत रोजच बाचाबाची होत आहे. शिवाय योजनेच्या देवराष्ट्रे आणि वांगी कार्यालयावर पाणी मागणीसाठी लोक धडकून जात आहेत. तरीदेखील पाण्याचे नियोजन होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

मागील १७ वर्षांपासून ताकारी योजनेने जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यांतील बहुतांश गावांचा दुष्काळ कायमचा दूर केला आहे. दिवाळीपासून उन्हाळ्याअखेर वरचेवर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे ताकारी लाभक्षेत्राचे ‘नंदनवन’ झालेचे पाहावयास मिळते. केवळ ताकारीमुळे हा भाग आर्थिकदृष्ट्या झाल्याचे सर्वश्रुत आहे. दरवर्षी नियमितपणे सोडलेली चार ते पाच आवर्तने सुरू करून संपूर्ण लाभक्षेत्राला पाणी दिले जाते.

यंदा मात्र अत्यल्प पावसामुळे या भागातील जमिनीत पाणीसाठा झालाच नाही. उपलब्ध असणारे पाणी उपसल्यानंतर दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई जाणवू लागली. तेव्हापासून २४ आक्टोंबर, १२ डिसेंबर, २ मार्च आणि सध्या १७ मेपासून सुरू असलेले चौथे आवर्तन लाभक्षेत्राची तहान भागवत आहे. मात्र, तरीही पाणीटंचाई जाणवतच आहे. जमिनीत नैसर्गिक पाणीसाठाच नसल्याने ताकारीचे मुरलेले पाणी उपसल्यानंतर लगेच ठणठणाट होत आहे. 

सदरच्या मुख्य कालव्यातून उपळावी (ता. तासगांव) पर्यंत सुमारे १४४ किलोमीटर पाणी जाते. शिवाय तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातून तडसरपर्यंत २८ किलोमीटर पाणीवितरण होते. चौथ्या टप्प्याकडे सतत २ पंपाद्वारे पाणी सुरू असते. मुख्य कालव्यात १० पंप सुरू ठेवावे लागतात. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाणी वितरणाची मर्यादा आणि पाणी मागणी यामध्ये तफावत वाढल्याने ताकारीचे अधिकारी व कर्मचारी कात्रीत सापडले आहेत. यातून पाणी उपलब्ध न होणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर खटके उडत आहेत. रोजच्या मनस्तापाने कर्मचारी वैतागून गेले आहेत. तर पाणी न मिळणारे शेतकरी चिंतेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT