Curfew in Parbhani city area till Sunday
Curfew in Parbhani city area till Sunday 
मुख्य बातम्या

परभणी शहर परिसरात रविवारपर्यंत कडक संचारबंदी

टीम अॅग्रोवन

परभणी : येथील जिल्हा रुग्णालयात दाखल एका कोरोना संशयित रुग्णाचा घशाचा स्त्राव (थ्रोट स्वॅब)चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. जिल्ह्यातील पहिला ‘कोरोना’ची लागण झालेला रुग्ण २१ वर्षीय तरुण आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परभणी शहर, तसेच परिसरात रविवार (ता.१९) पर्यंत संचारबंदी कडक करण्यात आली आहे. 

जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात गुरुवारी (ता.१६) सायंकाळी पाचपर्यंत ‘कोरोना’चे ४४९ संशयित रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी मंगळवारी (ता.१३) दाखल झालेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतील चाचणीनंतर ही बाब स्पष्ट झाल. एकूण ३२९ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले. विलगीकरण कक्षातून २३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

शासकीय क्वॉरंटाईन सेंटरमध्ये एकूण ६४ व्यक्ती ठेवण्यात आल्या. विलगीकरण कक्षात भरती असलेल्या पैकी २४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण परभणी शहरातील एमआयडीसी भागातील आहे. त्याचे निवासस्थान केंद्रीभूत ठेवून सभोवतालचा ३ किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. तेथील प्रत्येक घरातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

रुग्णाच्या निकट सहवासातील ५ व्यक्तींची जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन त्यांच्या थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित रुग्णास स्वंतत्र कोरोना कक्षात हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. 

शहर महानगरपालिका हद्दीत, हद्दीबाहेरील ३ किमी परिसरात गुरुवार (ता.१७) ते रविवार (ता.१९) पर्यत संचारबंदी लागू करण्याचे आदेश मुगळीकर यांनी दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT