Cultivate gram in a modern way: Dr. Deshmukh 
मुख्य बातम्या

आधुनिक पद्धतीने हरभरा लागवड करा : डॉ. देशमुख

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने हरभरा लागवड करावी’’, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हरभरा पिकाचे संशोधक डॉ. राजाराम देशमुख यांनी केले.

टीम अॅग्रोवन

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने हरभरा लागवड करावी’’, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हरभरा पिकाचे संशोधक डॉ. राजाराम देशमुख यांनी केले. 

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी विज्ञान मंडळाचे २७९ वे मासिक चर्चासत्र व रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ‘केव्हिके’चे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयआण्णा बोराडे, पुणे येथील ‘आयसीएआर-अटारी’चे संचालक डॉ. लाखन सिंग उपस्थित होते. शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा पिकांवर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. गहू संशोधन केंद्र, निफाड येथील गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यांनी गहू पिकाबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘हरभरा पिकात एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता प्रयोगातून सिद्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी विजय, दिग्विजय, जॅकी, आकाश, फुले विक्रम, फुले विक्रांत, विराट यासारख्या सुधारित वाणांची लागवड करावी. जिराईत पेरणीसाठी बियाणे चार ते पाच तास पाण्यात भिजवून लावावे. उगवण चांगली होते. कोरडवाहू पिकांसाठी रासायनिक खतांची मात्रा अर्धीच द्यावी. फुलोरा अवस्थेत पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी, बीबीएफ तंत्राने लागवड केल्यास उत्पन्नात वाढ होते.’’

डॉ. सिंग म्हणाले, ‘‘ हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘केव्हिके’ने विशेष काम केले. रेशीम उद्योग, बांबू लागवड, शेळीपालन आणि कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले.’’

बोराडे म्हणाले, ‘‘सध्या गहू व हरभरा या पिकांची पेरणी सुरू आहे. गव्हाचा तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित करण्यात निफाड संशोधन केंद्राचा मोठा सहभाग आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य पिके मुख्य प्रवाहात येत आहेत.’’

डॉ. दोडके म्हणाले, ‘‘गव्हाची वेळेवर पेरणी एक ते वीस नोव्हेंबर या कालावधीत, तर उशिरा पेरणी वीस नोव्हेंबरच्या पुढे करता येईल. वेळेवर पेरणीसाठी गव्हाचे त्र्यंबक, नेत्रावती, तपोवन, यूएएस-६२२२, एमएसीएस - ६४७८, फुले समाधान, राज -४०७८, तर उशिरा पेरणीसाठी एकेडब्ल्यू -४६२७, पीडीकेव्ही- सरदार या वाणांची लागवड करावी.’’

प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT