मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच कोटींचे पीक Crops worth Rs 5 crore damaged by mites and thrips 
मुख्य बातम्या

मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच कोटींचे पीक 

लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.

टीम अॅग्रोवन

भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी मुळे ५ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या या माहितीच्या आधारे  शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागमी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे. तालुक्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुडतुड्यांमुळे जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. हे क्षेत्र ७६० हेक्टर आहे. २ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर  प्रमाणे ५१ लाख ६८ हजार रुपयांचा निधी भरपाईपोटी शासनाकडून अपेक्षित आहे. आश्वासित सिंचनाखाली ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ३ हजार ४६५ हेक्टर आहे. यामुळे १० हजार २४० शेतकरी प्रभावित झाले. या शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांच्या शासकीय निधीची गरज आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मलीक विराणी, खंडविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांच्या नेतृत्वात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाला दिला आहे. त्यानुसार १२ हजार ५०० शेतकऱ्यांना मदती साठी ५ कोटी १९ लाख रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.  

असे आहे नुकसान    

  • एकूण शेतकरी    १२ हजार ५००
  • जिरायती    ७६० हेक्टर.
  • सिंचनाखाली    ३ हजार ४६५ हेक्टर.
  • भरपाईची मागणी    ५5 कोटी १९ लाख.  
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

    Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

    Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

    Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

    Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

    SCROLL FOR NEXT