crop loan
crop loan  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात कर्जवाटप अखेर पन्नाशीपार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी कर्ज देण्याची मुदत संपत आली असताना मराठवाड्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १४ सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ५४.१४ टक्के पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. व्यापारी बँकांची कर्ज पुरवठा करण्यात कमालीची अनास्था असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँकेने मात्र उद्दिष्टपूर्तीच्या उंबरठ्यापर्यंत कर्ज पुरवठा करण्याचे काम केले आहे. मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २१०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपये खरीप पीक कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत १४ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ५ लाख ८७ हजार ११९ शेतकऱ्यांना २०२५ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयाचा कर्जपुरवठा करत ९६.३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ग्रामीण बँकेला १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याची उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत ९५.११ टक्के उद्दिष्टपूर्ती करत २ लाख २४ हजार ६०९ शेतकऱ्यांना १५५६ कोटी ६३ लाख ७ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला.  व्यापारी बँका मात्र सर्वाधिक कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट मिळूनही प्रत्यक्ष कर्जपुरवठा करण्यात कमालीच्या माघारलेल्या असल्याचे चित्र आहे. व्यापारी बँकांना ८१६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टांचा पाठलाग करताना व्यापारी बँकांनी केवळ ३५.७ टक्के उद्दिष्टपूर्ती करत ३ लाख ९२६१ शेतकऱ्यांना २८६३ कोटी ६३ लाख ७० हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्यासाठी या वारंवार बैठका सूचना आदींच्या माध्यमातून प्रचंड पाठपुरावा केल्यानंतरही व्यापारी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती जलद गतीने होताना दिसत नाही. साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत खरिपासाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्यानंतर रब्बीसाठी कर्जपुरवठाचे काम सुरू होते.त्यामुळे व्यापारी बँकांकडून खरिपासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाची पूर्ती होईल की नाही हा प्रश्न आहे.

लातूर जिल्हा उद्दिष्ट:  २२८३ कोटी ९४ लाख पूर्ती :     १११६ कोटी ३१ लाख ६३ हजार टक्केवारी :     ४८.८८ उस्मानाबाद जिल्हा उद्दिष्ट:     १,५९० कोटी ५५ लाख ४७ हजार  पूर्ती:     १८२ कोटी ७९ लाख २२ हजार  टक्केवारी:     ४९.२२  नांदेड जिल्हा  उद्दिष्ट:    २०३१ कोटी ६७ लाख ७० हजार  पूर्ती:    ७७० कोटी ५८ लाख ११ हजार  टक्केवारी:     ३७.९३ औरंगाबाद जिल्हा  उद्दिष्ट:    ११९६ कोटी ८० लाख पूर्ती:     ११३३ कोटी पाच लाख ७५ हजार  टक्केवारी:    ९४.६७  जालना जिल्हा  उद्दिष्ट:     १११५ कोटी ३१ लाख ९० हजार  पूर्ती:       ७८३ कोटी ५९ लाख ७२ हजार  टक्केवारी:     ७०.२६  परभणी जिल्हा  उद्दिष्ट:      १५६७ कोटी २० लाख  पूर्ती:    ६१२ कोटी ११ लाख ६१ हजार  टक्केवारी:     ३९.६  हिंगोली जिल्हा  उद्दिष्ट:     ११६८ कोटी ९५ लाख  पूर्ती:    ४४८ कोटी ५९ लाख ४ हजार  टक्केवारी:     ३८.३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT