खानदेशमध्ये खेडा खरेदीत कापसाला ८२५० रुपये दर 
मुख्य बातम्या

खानदेशमध्ये खेडा खरेदीत कापसाला ८२५० रुपये दर

खानदेशात कापसाची ८२५० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी सुरू आहे. दरात गेले काही दिवस सुधारणा किंवा वाढ झाली आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव :  खानदेशात कापसाची ८२५० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी सुरू आहे. दरात गेले काही दिवस सुधारणा किंवा वाढ झाली आहे. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखाने गेल्या १० दिवसांत वेगात सुरू आहेत. कोरडे व निरभ्र वातावरण असल्याने कापूस प्रक्रियेला वेग आला आहे. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू आहे.  सप्टेंबरमध्ये सुरुवातीला ५२००, सप्टेंबरच्या अखेरीस ६२०० आणि ऑक्टोबरमध्ये ६५००, ६८००, ७०००, ७५०० अशी दरात सतत सुधारणा किंवा वाढ झाली. गेल्या दोन - तीन दिवसांत भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागांत कापसाची खेडा खरेदी ८२५० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे. हा या हंगामातील कापसाला खेडा खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे. 

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात दाखल झाले आहेत. अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागांत कापूस दर अधिक मिळत आहेत. कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातेत लवकर पोहोचणे शक्य आहे. अनेक शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस विक्री सध्या टाळत आहेत. कारण उत्पादन कमी आले आहे. खर्च अधिक आहे. नुकसान भरून निघण्यासाठी अधिकचा नफा अपेक्षित आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया...

सध्या कापसाची आवक स्थिर आहे. दरवाढ सुरू असून शेतकरी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करीत आहेत. खानदेशात सध्या रोज एक लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. पुढे काही दिवस दर स्थिर राहतील. डिसेंबर महिन्यानंतर पुन्हा दरवाढ होईल. - अनिल सोमाणी, संचालक,  खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

कापूस दरात वाढ होत आहे, कारण कापूस उत्पादन कमी आहे. दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा. - प्रवीण पाटील,  शेतकरी, खेडी खुर्द (जि.जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Advisory: भात पीक सल्ला : कोकण विभाग

Dairy Farming Success Story: गोपालनात गोठ्यामध्येच पैदाशीवर भर

Farm Road Scheme: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी होणार

Fish Farming: मत्स्यपालनामध्ये व्यावसायिक संधी...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

SCROLL FOR NEXT