cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच खुल्या बाजारातील कापूस दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी वधारले आहेत. खुल्या बाजारात किंवा खेडा खरेदीत कापसाचे दर ५२११ ते ५२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.  खानदेशात कापूस महामंडळाने (सीसीआय) गेल्या आठवड्यात खरेदी सुरू केली. 

खरेदी वेगात सुरू असून, मोठ्या तालुक्यांत किंवा अधिक आवक असलेल्या केंद्रातील भार वाढू नये यासाठी इतर दोन केंद्रांचीदेखील नियुक्ती केली आहे. आवक वाढल्याने प्रक्रिया थांबणे व खरेदी बंद करणे, असा प्रकार यंदा होणार नाही, याची काळजी घेतली आहे. ‘सीसीआय’चे केंद्र वेगात सुरू असतानाच खेडा खरेदीत कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. 

खानदेशात दरवर्षी मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानदार खरेदी करतात. परंतु गेल्या वर्षी कारखानदार अडचणीत आल्याने खरेदी झाली नाही. यंदाही खासगी कारखानदार खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या सुरवातीला कापसाचे दर ४५००, ४७०० व ४९०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. शासकीय खरेदी सुरू होत नसल्याने खासगी खरेदीदार लुटालूट करीत असल्याचा आरोप केला जात होता. परंतु गेल्या आठवड्यात शासकीय खरेदी सुरू होताच खुल्या बाजारातील कापसाचे दर ५२११ ते ५२५० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत.  खेडा खरेदीला प्रतिसाद नाहीच किरकोळ खरेदीदार खेडा खरेदी करीत आहेत. परंतु शासकीय केंद्रात किमान ५६०० व कमाल ५७२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी नजीकच्या शासकीय केंद्रात कापसाची विक्री करीत आहेत. खेडा खरेदीला शेतकरीच प्रतिसाद देत नसल्याची स्थिती गेल्या आठवड्यात तयार झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT