Cotton prices under pressure in Wardha market committee 
मुख्य बातम्या

वर्धा बाजार समितीत कापूस दर दबावात

वर्धा : टेक्स्टाईल उद्योजकांकडून केंद्र सरकारकडे कापूस दरवाढ प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कापसाचे दर १५० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत.

टीम अॅग्रोवन

वर्धा : टेक्स्टाईल उद्योजकांकडून केंद्र सरकारकडे कापूस दरवाढ प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कापसाचे दर १५० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. गुरुवारी (ता.६) वर्धा बाजार समितीत ९५०० ते ९८५० रुपयांनी कापसाचे व्यवहार झाले. 

हिंगणघाट बाजार समितीत दहा १०४०० रुपयांनी बुधवारी (ता.५) कापसाचे व्यवहार झाले होते. सिंदी रेल्वे बाजार समितीत ९९०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. सध्यास्थितत सिंदी बाजार समितीत ९७०० रुपयांवर कापसाचे दर स्थिर आहेत. बुधवारीच (ता.५)  वर्धा बाजार समितीत कापूस दराने दहा हजार रुपयांवर झेप घेतली होती. आजवर वर्धा बाजार समितीत ७३ हजार १०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. बुधवारी कापसाची ८०० क्विंटलची आवक झाली. गुरुवारी (ता.६) कापूस दरात १५० ते २०० रुपयांची घट नोंदविण्यात आली. 

टेक्सस्टाईल उद्योजकांकडून दर नियंत्रणासाठी दबावाच्या पार्श्वभूमीवर दरात घसरण झाल्याचे सांगण्यात आले. ९५०० ते ९८५० रुपये असे कापसाचे दर होते. बाजार समितीत तुरीची देखील नियमित आवक होत असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी १५ क्विंटल आवक होऊन ५१७५ ते ५७६५ रुपयांचा दर मिळाला. गव्हाचे व्यवहार १८०० ते १८३५ रुपयांनी झाले. गहू आवक १२ क्विंटल होती. सोयाबीनची १८२ क्विंटल आवक झाली. ५८०० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल असा सोयाबीनचा दर होता. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात तेजी आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amrutvahini University : संगमनेरच्या अमृतवाहिनी विद्यापीठाला मान्यता

Jaggery Research Centre: शशिकांत तरंगे यांची प्रादेशिक ऊस, गूळ संशोधन केंद्रास भेट

Government Schemes : जलसंधारण, महिला सक्षमीकरण, घरकुल, औद्योगिक विकासाला प्राधान्य

Solapur Fruit Market : सोलापूरच्या बाजारात डाळिंबानंतर ‘ड्रॅगन’ची लाली

Water Projects Update: चंदगडमधील प्रकल्प तुडुंब; शेतीला जलसंजीवनी

SCROLL FOR NEXT