Cotton prices rise again in Ralegaon
Cotton prices rise again in Ralegaon 
मुख्य बातम्या

राळेगावमध्ये कापसाच्या दराला पुन्हा झळाळी

टीम अॅग्रोवन

राळेगाव, जि. यवतमाळ : या वर्षी कापसाचे भाव नवनवे उच्चांक गाठत आहेत. महिन्याभरापूर्वी कापसाचे भाव दहा हजारांचेही पुढे गेले होते. पण, रशिया-युक्रेन युद्धानंतर भाव दहा हजारांच्याही खाली आले. मात्र, आता कापसाच्या भावाने पुन्हा उसळी घेतली आहे. भाव दहा हजार आठशे रूपये झाले आहेत. 

यावर्षी सुरूवातीपासूनच कापसाला चांगले भाव मिळत आहेत. प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव व्हायला बराच वेळ लागला. पण पाहता पाहता कापसाचे भाव दहा हजार पाचशे रूपयांच्याही वर गेले. दर अकरा हजार रुपये क्विंटलचा पल्ला गाठेल, असे वाटत असतानाच मधेच रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू झाले. युद्धामुळे भावात घसरण होऊन भाव दहा हजारांच्याही आत आले.

युद्धामुळे भाव आणखी खाली येतील, असे शेतकऱ्यांना वाटले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत कापूस विकला. भावात जवळपास पंधरा दिवस मंदी होती. पण, पुन्हा हळूहळू भाव वाढायला लागले. मंगळवारी तर तालुक्यात कापसाला दहा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला. 

शेतात अजूनही कापूस 

कापसाला या वर्षी विक्रमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कपाशी अजूनही उपटली नाही. शेतकरी फरदड कापूस घेत आहेत. कारण चांगल्या कापसाप्रमाणेच फरदड कापसालाही यावर्षी विक्रमी भाव आहे. पूर्वी फरदड कापसाला कोणी विचारत नव्हते. गाद्या-दुलई शिवायचा कामी तो कापूस यायचा व त्याला भावही नाममात्र तीन-चार हजार मिळायचा. पण त्या कापसालाही सध्या सात ते आठ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतो आहे. या वर्षी मुळातच उत्पादन अतिशय कमी आहे. शेतकरी या संधीचेही सोने करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT