Cotton prices remain stable in Pakistan
Cotton prices remain stable in Pakistan 
मुख्य बातम्या

पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकून

टीम अॅग्रोवन

पुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ झाली असली, तरी येथील उद्योगाची गरज भागविण्यासाठी हे उत्पादन कमीच पडणार आहे. त्यामुळे यंदा उत्पादनाऐवढीच म्हणजेच ७५ लाख गाठी (१७० किलो) कापसाची आयात होणार आहे. सध्या येथे रुईचे दर १३ हजार ५०० ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रति मणावर (एक मण म्हणजेच ३७.३२ किलो रुई) आहेत. तर कच्च्या कापसाचे दर ४ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति ४० किलोवर आहेत. 

पाकिस्तानमध्ये यंदा ७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. तर ७५ लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. येथील आयातदारांनी आतापर्यंत ४५ लाख गाठी कापूस आयातीचे करारही केले आहेत. पाकिस्तानचा विचार करता कापूस रुईचे दर १३ हजार ५०० ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण आहेत. तर हजर बाजारात रुई प्रतिमण १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपयांवर टिकून आहे. तर कच्या कापसाचे भाव ५ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपये प्रति ४० किलो आहेत. 

पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकून असून, कापसाचा व्यापार मात्र कमी होत आहे, असे येथील व्यापारी एजन्सीने सांगितले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रुईचे दर १५ हजार ते १६ हजार ७०० पाकिस्तानी रुपयांवर स्थिर आहेत. तर कच्या कापसाचे दर प्रति ४० किलोसाठी ५ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपयांवर आहेत. सिंध प्रांतात कच्च्या कापसाचे दर ४ हजार ५०० ते ६ हजार ८०० पाकिस्तानी रुपयांवर आहेत. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रुईचे भाव १५ हजार ५०० ते १६ हजार ५०० रुपये प्रतिमण आणि कच्च्या कापसाचे भाव ६ हजार २०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति ४० किलोवर आहेत.

सरकीही खातेय भाव पाकिस्तानमध्ये कापसाबरोबरच सरकीही भाव खात आहे. येथील पशुधन खाद्यात सरकी पेंडेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरकी पेंडीला जास्त मागणी असते. सध्या पाकिस्तानमध्ये सरकीचे दर १ हजार ३५० रुपये ते २ हजार १०० रुपये प्रतिमणावर आहेत. तर पंजाबमध्ये सरकीचे दर १ हजार ६०० रुपये ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.

यंदा पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन वाढीची शक्यता आहे. तर आयातही ७५ लाख गाठींवर होईल, असा अंदाज आहे. आयातदारांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ४५ लाख गाठी कापूस आयातीसाठीचे करार झाले आहेत. - नईम उस्मान, कापूस व्यापारी, कराची

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT